Congress Core Committee meeting
Congress Core Committee meetingSarkarnama

Maharashtra Politics : राज्यातील घडामोडींबाबत काँग्रेस हायकमांड शरद पवारांशी चर्चा करणार

Congress Core Committee meeting : मुंबईत काँग्रेस कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते.
Published on

Mumbai News : ज्येष्ठ नेते शरद पवारांबद्दल काँग्रेसमध्ये कोणताही संभ्रम नाही, संभ्रम जनतेत आहे. शरद पवार हे मोठे नेते असून ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते भाजपच्या विरोधात लढणार असून इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत.ते पवारांशी मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी चर्चा करणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. (Congress high command will discuss with Sharad Pawar about the developments in state)

मुंबईत काँग्रेस कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. या वेळी इंडिया आघाडीची मुंबईत ता. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वासही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

Congress Core Committee meeting
Swabhimani Will Split Fifth Time : तुपकरांची शिस्तपालन समितीकडे पाठ; स्वाभिमानी पाचव्यांदा फुटणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजितदादांचा गट भाजपसोबत गेला आहे, तर अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत आहेत. मात्र, त्यांच्यात वारंवार होणाऱ्या गाठीभेटीमुळे राज्यात संभ्रमाची अवस्था आहे. त्यातून नाना पटोले यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत यांनी पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती.

बीडच्या दौऱ्यावर असलेल्या पवारांनी आपण भाजपसोबत कधीही जाणार नाही. आपण महाविकास आघाडीसोबत कायम आहोत, असे सांगितले. काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी नरमाईची भूमिका घेत पवारांनी इंडिया आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस संभ्रमात नाही तर जनता संभ्रमात आहेत, असे विधान पटोले यांनी पवारांबाबत केले आहे.

Congress Core Committee meeting
Another Party Leave MVA: आणखी एक पक्ष महाआघाडीची साथ सोडणार; शब्द न पाळल्याचा आरोप करत युतीसोबत जाण्याचे संकेत

या बैठकीत राज्यात ३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पदयात्रेची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. तसेच, ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावरही चर्चा झाली. महाविकास आघाडी एकत्र लढली तर आम्ही ४० ते ४५ जागा जिंकू, असा दावा करत आमचे टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे, त्यामुळे आमच्यासोबत जे येतील, त्यांना घेऊन आम्ही लढणार आहेात, असेही पटोले यांनी नमूद केले.

Congress Core Committee meeting
R. R. Patil Jayanti: ‘चोरच तुम्हाला उचलून नेतील’ असे ऐकवून आरआर आबांना ‘वॉचमन’ची नोकरी नाकारली होती

या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com