Shrijaya Chavan : माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री

Shrijaya Chavan : श्रीजयाच्या रूपाने चव्हाण कुटुंबातील दुसऱ्या महिलेनं राजकारणात एन्ट्री केली आहे.
Shrijaya Chavan
Shrijaya Chavansarkarnama

Ashok Chavan : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या नांदेड मध्ये सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक बडे नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत.

या सर्व नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील एका व्यक्तीनं सगळ्याचे लक्ष वेधून घेतलं आहे. याबाबत सोशल मीडियामध्ये चर्चा रंगल्या आहेत. याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक टि्वट केलं आहे. यानिमित्ताने त्यांनी आपल्या राजकीय वारसदार कोण असेल, याबाबत संकेत दिले आहेत. (Shrijaya Chavan latest news)

काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची नात व माजी मुख्यमंत्री अशोक व अमिता चव्हाण यांची कन्या श्रीजया (Shrijaya Chavan) हिचे राजकीय पदार्पण आता निश्चित झाले आहे. अशोक चव्हाण यांनी टि्वट करीत एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय वारसदार जाहीर केला आहे. त्यांनी केलेल्या टि्वटमुळे त्यांची धाकटी कन्या श्रीजया त्यांचा लोकसेवेचा वारसा चालवेल, हे आता स्पष्ट झाले आहे.

चव्हाण दाम्पत्याच्या जुळ्या कन्यांपैकी श्रीजयाची राजकीय क्षेत्रातील आवड मागील काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये तिचे छायाचित्र आवर्जून छापले जात आहे. चव्हाण परिवाराने तिच्या राजकीय पदार्पणाची घोषणा अधिकृतपणे केलेली नव्हती.

श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. चालता चालता तिने खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्विट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर जणू शिक्कामोर्तबच केले.

Shrijaya Chavan
Sanjay Raut यांना दिलासा मिळणार की पुन्हा कोठडी ; आज सुनावणी

“पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच राहात असणार आहे,” असे टि्वट अशोक चव्हाण यांनी श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाची घोषणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशोक चव्हाण यांनी शंकररावांचा राजकीय वारसा पुढे नेताना मागील दशकात पत्नी अमिता यांना राजकारणात आणले; पण पाच वर्षांच्या आमदारकीनंतर त्या निवडणुकीतून बाजूला झाल्या. त्या अनेक वर्षे साखर कारखान्याच्या संचालक व काही काळ उपाध्यक्ष होत्या. आता त्यांच्यानंतर श्रीजयाच्या रूपाने चव्हाण कुटुंबातील दुसऱ्या महिलेनं राजकारणात एन्ट्री केली आहे.

कोण आहे श्रीजया चव्हाण

श्रीजयाने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. आई-वडिलांच्या निवडणूक प्रचार काळात वेगवेगळ्या ठिकाणी ती फिरल्याचे, मतदारांना भेटल्याचे सर्वांना ठाऊक आहे. मागील अनेक महिन्यांपासून श्रीजया अशोक चव्हाण यांच्या राजकारणातील पदार्पणाची चर्चा सुरू होती. गेल्या काही काळापासून वडिलांच्या ‘बॅक ऑफिस’ची जबाबदारी सांभाळते आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क आदी बाबींवर ती लक्ष ठेवते. मात्र, आजपर्यंत निवडणूक प्रचार वगळता तिने स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले होते.

भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. यात्रेच्या स्वागतार्थ झळकलेल्या जाहिराती व फलकांमध्येही त्यांची छायाचित्रे होती. सहाजिकच भारत जोडो यात्रेतून त्यांचा राजकारणातील प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते आणि ती चर्चा आज अशोक चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमुळे खरी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com