फडणवीसांना वाटते ‘मी पुन्हा येईन’ पण ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत...

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
Atul Londhe, Devendra Fadanvis
Atul Londhe, Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देशावर ७०० वर्ष मुस्लिमांनी राज्य केले तर १५० वर्ष इंग्रजांनी राज्य केले. या राजवटीत हिंदूंना काही धोका नव्हता आणि आजही नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून हिंदूंना धोका असल्याची जी आवई उठवली जात आहे त्यात 'मी पुन्हा कधीही सत्तेत येऊ शकणार नाही' हा खरा धोका त्यांच्यासाठी आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी लगावला आहे.

Atul Londhe, Devendra Fadanvis
भोंग्याच्या वादावर मुस्लीम संघटनेने घेतला मोठा निर्णय...

लोंढे म्हणाले की, सनातनी म्हणतात की, धर्म धोक्यात आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, महाराष्ट्र भाजपाची पुन्हा सत्ता येत नाही तर देशातील सत्ता हिंदूंना भीती दाखवल्याशिवाय कायम राहू शकत नाही. अशा परिस्थितीत फडणवीसांना वाटते की, ‘मी पुन्हा येईन,’पण हिंदूंची मते काही भाजपाला मिळत नाहीत आणि हिंदूंच्या मतांशिवाय पुन्हा सत्तेत कसे येणार हीच खरी भिती त्यांना आहे, अशा शब्दात लोंढेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.

हेही वाचा : धनंजय मुंडेंना धमकावणं महागात! मेव्हणीचा मुक्काम थेट पोलीस कोठडीत

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलाकाराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला (Renu Sharma) पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. न्यायालयाने रेणू शर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा (Karun Sharma) यांची रेणू ही बहीण आहे.

मुंडे यांनी गेल्या वर्षी तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी रेणूने मुंडेंच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी ही तक्रार मागे घेण्यात आली होती. त्यानंतर तिने मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपये, एक दुकान, महागडा स्मार्टफोन आणि अन्य भेटवस्तू मागितल्या होत्या. या वस्तू न दिल्यास बलात्काराची खोटी तक्रार दाखल करेन, अशी धमकी तिने मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांनी सुरुवातीला रेणू शर्माला तीन लाख रुपये आणि दीड लाखांचा स्मार्टफोन दिला होता. तरीही तिचे धमकावणे सुरू राहिल्याने अखेर मुंडे यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

मुंबई पोलिसांनी रेणू शर्माला यांना इंदोरमधून अटक केली. त्यानंतर तिला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. आज तिला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मी रेणू शर्माला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता. त्यानंतरही या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती , असे मुंडेंनी तक्रारीत म्हटले होते.

रेणू शर्माने मागील वर्षी मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून तिने भूमिका मांडली होती. ती म्हणाली होती की, धनंजय आणि त्यांच्या द्वितीय पत्नी करुणा यांच्यात मतभेद असून त्यावरून न्यायालयात खटलाही सुरू आहे. त्यामुळे मी मानसिक तणाव आणि दबावाखाली होते. एका मोठ्या राजकीय षडयंत्राची मी शिकार होत असल्याची जाणीव मला झाली होती. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय यांना लक्ष्य करत होते आणि हे चुकीचे असल्याचे मला समजत होते. धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. धनंजय यांनी मला कधीही लग्नाचे वचन दिले नव्हते की बलात्कार केला नव्हता. त्याबद्दलचे कसलेही फोटो किंवा व्हीडओ नाहीत. कारण असे कधी घडलेच नव्हते. त्यामुळे मुंडे यांच्याविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही आणि मी हा खुलासा पूर्णपणे शुद्धीत करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com