मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन राज्य सरकारवर विधानसभेत आरोप केले. त्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनीही फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. फडणवीसांच्या काळातच राज्यात गुन्हेगारीची सुरुवात झाली, असे पटोले म्हणाले.
या वेळी बोलताना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो, ते नटसम्राटच आहेत. कायदा सुव्यवस्थेवर त्यांनी चांगले मुंद्दे मांडले. त्यांचे कौतुक केले पाहिजे. मात्र, या लोकांना त्यांचे कौतुकही पाहवत नाही. मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळी सभागृहात आलो. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असलो तरी एकत्र काम करत होते, असे पटोले यांनी सांगितले.
राज्यात मागचे युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून परिस्थिती बद्दली. २०१७ मध्ये माझा फोन टॅपिंग झाला. पोलिसांचा वापर केला जातो असे फडणवीस म्हणाले. मात्र, पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा वापर कोणी केला. याचे उत्तर दिले पाहिजे. राज्यातील गुन्हेगारी ही फडणवीस यांच्या काळापासून सुरु झाली, असा आरोप पटोले यांनी केला. फोन टॅपिंग प्रकरणापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुर झाले आहे, असा टोला पटोले यांनी लगावला.
कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. त्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिस करत होते. मात्र, पहाटेचे सरकार पडले आणि त्यानंतर-भीमा कोरेगावचे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवले गेले. त्यामध्ये असे काय होते की ते प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे पाठवले गेले. ते महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे, असे पटोले म्हणाले.
राज्यात गुन्हेगारी कुठून सुरु झाली. त्याच्या तळाशी आपण केव्हा जाणार, असा सवाल पटोले यांनी केला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करता मग, इक्बाल मीर्चीसुद्धा दाऊदचा माणूस होता. इक्बालच्या माध्यमातून पैसे कुणी घेतली. ते पैसे घेतले त्यांची जबाबदारी कोणाची आहे. इक्बाल मीर्चीचे पैसे कोणत्या पक्षाने घेतले, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, असेही पटोले म्हणाले. मुंबई बॅंकेमध्ये घोटाळा झाला. त्या घोटाळ्यातील आरोपी सुद्धा खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांचा राजीनामा पण घेतला पाहिजे. मलिकांवर कारवाई करा म्हणता तर मग त्या घोटाळ्यातील आरोपींचे काय, असा सवाल पटोले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.