Nana Patole News : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा फक्त चेहरा ; देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम : नाना पटोलेंनी वात पेटवली

Congress News : दोन दिवसापूर्वी मंत्रालयात शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन आंदोलन करत सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nana Patole News
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याचे स्पष्ट झाले असून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांत अधिकारपदावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे केवळ चेहरा असून खरे मुख्यमंत्री 'सुपर सीएम' हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा घणाघात काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (ता. ३१ ऑगस्ट) मुंबईत केला.

मविआ सरकारने अनुभवलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) दादागिरीला सध्या चाप लावला गेला आहे, अशी कोपरखळीही पटोलेंनी प्रदेश कार्यालयात रक्षाबंधन साजरे केल्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत मारली. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पिण्याचे पाणी नाही, चारा नाही, त्याकडे सरकारचे लक्ष नाही आणि तिन्ही पक्षात खुर्चीच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. तिघाडी सरकारमध्ये मलईसाठी भांडणे सुरू आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nana Patole News
Gopichand Padalkar News : गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, शिंदे गटाच्या आमदाराची धडधड वाढली

दोन दिवसापूर्वी मंत्रालयात शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन आंदोलन करत सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पण, या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. महाराष्ट्र झपाट्याने पिछाडीवर जात असताना सरकारमधील मंत्री मात्र खोटे आकडे दाखवत जनतेची फसवणूक करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मनसेने सरकारला जाब विचारावा...

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या तोंडावर पंचपक्वानांचे ताट देणाऱ्या 'इंडिया' आघाडीला लाज वाटत नाही का? अशी टीका इंडियाच्या मुंबईतील बैठकीच्या मेजवानीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी आज केली होती. त्यावर राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीची जाणीव असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nana Patole News
Nashik MVA News : भाजप हटाव, देश बचाव 'इंडिया'च्या बैठकीला पाठिंबा ; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष !

तसेच देशभरातून 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पंचपक्वान्न नाही, तर झुणका भाकर, वडापाव व पुरणपोळी हे महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ जेवणात असणार आहेत, ही मेजवानी कशी ? अशी उलट विचारणा त्यांनी केली. राज्यातील दुष्काळी स्थितीला तिघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत असून त्यांना मनसेने जाब विचारला पाहिजे, असे सांगत आपल्यावरील आरोपाचा चेंडू त्यांनी महायुती सरकारकडे टोलवला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com