Nana Patole : चंद्रकांतदादांना 'भीक' आणि 'लोकवर्गणी'तला फरक कळत नसावा; नाना पटोलेंचा पलटवार

Nana Patole : चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक तरी कळतो का?
Nana Patole-Minister Chandrakant Patil News, Aurangabad
Nana Patole-Minister Chandrakant Patil News, AurangabadSarkarnama

Nana Patole News : भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळा आणि सरकारी अनुदान याविषयी बोलताना महापुरुषांचा दाखला दिला. यावेळी त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं आक्षेपार्ह विधान केल्यानं नवीन वाद निर्माण झाला आहे. या त्यांच्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी पाटलांवर टोकेची झोड उठवली जात आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत हल्लाबोल केला आहे.

Nana Patole-Minister Chandrakant Patil News, Aurangabad
Ramdas Athawale : ठाकरे-आंबेडकर एकत्र; रामदास आठवलेंचं मोठं चॅलेंज

नाना पटोले म्हणाले, " भाजपा नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी झाली असून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्याने अजून माफी मागितली नाही.

तोच भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक तरी कळतो का? असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे.

Nana Patole-Minister Chandrakant Patil News, Aurangabad
Lok Sabha Speaker Om Birla : असं न कराल तर चांगलं राहील; लोकसभा सभापतींचा खासदारांना इशारा

तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोर-गरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्वस्व दिले. लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. लोकसहभागातून शैक्षणिक संस्थांचा विस्तार गावखेड्यात केला. ह्या महान कार्यासाठी त्यांनी भीक मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचाच अपमान केला असे नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला असल्याची टीका देखील पटोले यांनी यावेळी केली आहे.

"समाजाच्या विकासासाठी सरकारने निधी खर्च करणं त्यांचं कर्तव्यच आहे. शिक्षणावर खर्च करायचा नाही तर मग काय सरकारच्या जाहिरातबाजींवर करोडो रुपयांची उधळपट्टी करायची काय? सरकार जनतेच्या आरोग्य, शिक्षणासह कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च करणार नाही तर मग कशावर करणार? सरकार जनतेसाठी पैसे खर्च करते म्हणजे काय उपकार करत नाही, जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरायचा असतो हे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मंत्र्याला माहित नसावे, कारण त्यांचा पक्ष दोन-चार उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला आहे आणि या उद्योगपतींच्या घरीच चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाचे सरकार पाणी भरते आणि जनतेच्या प्रश्नावर मात्र उलटे प्रश्न विचारतं असेही पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com