Sachin Sawant On BJP Leader: भगवी बिकीनी चालत नाही, पण भगवा कार्पेट चालतो..?; भाजप नेत्यांना काँग्रेसचा सवाल

Sachin Sawant Attack on BJP leader: भगव्या कार्पेटवरुन दोन्ही मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांसह चालत जात असल्याचे दिसत आहे.
Congress Leader Sachin Sawant
Congress Leader Sachin SawantSarkarnama
Published on
Updated on

'किंगखान' शाहरुख खान याच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावर काही दिवसापूर्वी झालेला वादाची आठवण काँग्रेस नेत्यानं केलेल्या एका टि्वटमुळे नेटकऱ्यांनी पुन्हा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल (रविवारी) अयोध्या दौरा झाला. या दौऱ्याचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

अयोध्या दौऱ्यानंतर शिंदे यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. या भेटीचे फोटो, व्हिडिओ माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. यात भगव्या कार्पेटवरुन दोन्ही मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांसह चालत जात असल्याचे दिसत आहे.

यावरुन काँग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांना टोमणा हाणला आहे. सावंत यांनी टि्वट केलेल्या व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी रिटि्वट केला आहे. त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Congress Leader Sachin Sawant
Chhatrapati Shivaji Statue News : धक्कादायक : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिक रस्त्यावर..

'पठाण' सिनेमातील भगवी बिकीनीवरुन भाजप नेत्यांनी केलेली टीकेची आठवण सावंतानी त्यांना करुन दिली आहे. "भगवी बिकीनी चालत नाही पण भगवा कार्पेट चालतो. बिनधास्त पादत्राणे घालून भगवा कार्पेट तुडवा. जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळून सत्तेचा सारीपाट भाजपा कसा मांडते यांचे हे उदाहरण. दांभिकपणा हा भाजपाचा स्थायीभाव आहे.धार्मिक द्वेष पसरविण्यातून यांचे राजकारण होते पण देश कमजोर होत आहे," असे सचिन सावंत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com