Sachin Sawant: ...मग यशवंतरावांची समाधी आहेच, आत्मक्लेश करायला! सावंतांनी अजितदादांना काढला चिमटा

Maharashtra Politics: लोकसभा निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार...
Maharashtra Politics News
Maharashtra Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: 'भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत, त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देतो,' असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काँग्रेसचे नेते, प्रवक्ते सचिन सावंत यांनी फटकारले आहे.

भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना आगामी लोकसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर लढवावी लागणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर अजित पवारांनी काल (22 डिसेंबर) स्पष्टीकरण दिले आहे. अजितदादांनी काल पक्षाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक आपण महायुतीसोबत एकत्रितपणे आणि घड्याळ या चिन्हावरच लढणार असल्याबाबतही भूमिका स्पष्ट केली.

अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करीत आपण आता भूमिका बदलणार नसून आपल्याला कुणालाही फसवायचे नसल्याचेही सांगितले. ते म्हणाले, भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देतो असेही ते म्हणाले. अजित पवारांच्या या विधानाची सचिन सावंतांनी खिल्ली उडवली आहे. सावंतांनी टि्वट करीत अजितदादांना चिमटा घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'स्टँपपेपर डुप्लिकेट देखील मिळतात, तो जुन्या तारखेचा आहे किंवा दुसऱ्याच्या नावावर आहे, असेही सांगता येते. नंतर ती माझी सहीच नाही, असे म्हणण्याची बनवाबनवी शिंदे गटाच्या आमदारांनी शिकवलीच आहे. हे सगळे करूनही जमले नाही तर मग स्व. यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहेच, आत्मक्लेश करायला! त्यापश्चात देखील पत्रकारांनी प्रश्न विचारले तर 'एक मिनिट, एक मिनिट' म्हणून दरडावण्याची क्लृप्ती आम्ही अगोदरच आत्मसात केली आहे. नाही का?' असा सवाल सावंतानी उपस्थित केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Maharashtra Politics News
Pune Police: धक्कादायक: पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com