काँग्रेस आमदारांनीच क्रॉस व्होटिंग करत माझा पराभव घडविला : चंद्रकांत हंडोरेंनी मौन सोडले!

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर हंडोरे हे नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली होती.
Chandrakant Handore
Chandrakant HandoreSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचे पराभवासंदर्भात प्रथमच वक्तव्य आले आहे. काँग्रेसमधीलच काहींनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे माझा पराभव झाला. ज्यांनी माझ्याविरोधात मतं दिली आहेत, त्यांच्याविरोधात राहुल गांधींकडे (Rahul Gandhi) तक्रार केलेली आहे. ज्यांनी पक्षाविरोधात काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी मला अपेक्षा आहे, असे हंडोरे यांनी स्पष्ट केले. (Congress MLAs caused my defeat by cross-voting : Chandrakant Handore)

हंडोरे यांनी भीमशक्ती या संघटनेची राज्यव्यापी चिंतन बैठक आज (ता. २४ जुलै) मुंबईतील चेंबूरमध्ये आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या माध्यमातून हंडोरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर हंडोरे हे नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांची वरील भूमिका महत्वाची ठरते.

Chandrakant Handore
मुंबई पालिकेनंतर राज्यात मध्यावधी निवडणुका : रोहित पवारांचे भाकित

माजी मंत्री हंंडोरे म्हणाले की, काँग्रेसने मला दोन वेळा आमदार बनवले आहे, त्यानंतर मंत्री बनवलं आहे. मागील निवडणुकीत विधान परिषदेचे तिकीटही दिले होते. मात्र, काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यामुळे त्या निवडणुकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले. हार-जीत ही निवडणुकीत होतच असते. पण, माझ्याविरोधात ज्यांनी मतं दिली, त्यांच्याविरोधात राहुल गांधींकडे तक्रार केलेली आहे. त्याची दखल घेत पक्षनेतृत्वानेही तत्काळ निरीक्षक पाठवून अहवाल बनवला आहे. पक्षाच्या विरोधात ज्या आमदाराने काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असेही हंडोरे यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Handore
ओबीसी आरक्षण : सोलापूर झेडपीत २०, तर पंचायत समितीत ३६ जागा असणार!

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि बंडखोर शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव होऊनही त्याची चर्चा शिंदे यांच्या बंडामुळे मागे पडली होती. मात्र, एवढे दिवस पराभवावर शांत असणारे हंडोरे यांनी अखेर मौन सोडून संबंधित कारवाईची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com