Nana Patole : भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही बारामतीत लक्ष घातले....

Baramati News : बारामतीला राष्ट्रवादीच्या ताब्यातून घेण्यासाठी भाजप, काँग्रेसने कंबर कसलेली दिसते.
Nana Patole-Sharad Pawar
Nana Patole-Sharad Pawar Sarkarnama

Baramati News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आज (सोमवारी) भाजपच्या “मिशन १४४’च्या दुसऱ्या टप्प्याला चंद्रपुरातून सुरवात होत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन बारामती हाती घेतले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील येत्या गुरुवारी बारामतीत येत आहेत. त्यामुळे बारामतीला राष्ट्रवादीच्या ताब्यातून घेण्यासाठी भाजप, काँग्रेसने कंबर कसलेली दिसते.

काही महिन्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बारामतीचा दौरा केला होता. या निमित्ताने भाजपने बारामती लोकसभा मतदार संघ काबीज करण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी प्रारंभ केला आहे. भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचा सूचना दिल्या आहेत.

भाजपनंतर काँग्रेसही आता बारामती आपली ताकद आजमावून पाहत आहे. प्रदेश काँग्रेसकडून बारामतीत काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास पटोले मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी दिली.

Nana Patole-Sharad Pawar
West Bengal: भष्ट्राचारी नेत्यांचे दाबे दणाणले ; TMC चा मोठा निर्णय

बारामतीच्या कार्यकर्त्यांना पटोले काय मार्गदर्शन करतात, याकडे आता राजकीय वर्तुळातील निरीक्षकांचे लक्ष आहे. बारामतीत पटोले फक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत की पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने ते चाचणी करणार आहेत, हे लवकरच समजेल.

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबतच काँग्रेस,राष्ट्रवादी हे घटक पक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने देखील बारामतीत आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले की काय अशी चर्चा पटोले यांच्या या दौऱ्यामुळे सुरू झाली आहे.

अनेक वर्षांपासून बारामतीत राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. सर्व संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट अजित पवार यांनी जप्त करून राज्यात सर्वाधिक मताधिक्य पटकावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com