प्रणिती शिंदे अन् वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी

काँग्रेस पक्षाकडून निश्चित करण्यात आलेल्या तीस जणांच्या यादीत दोघांचा समावेश आहे.
Varsha Gaikwad, Praniti Shinde
Varsha Gaikwad, Praniti ShindeSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. नेत्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सुरूवातही केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) घातलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर लवकरच प्रचार सभांचा जोर वाढेल. तसेच डिजिटल माध्यमांतूनही प्रचार सभा होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने (Congress) सोमवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांच्या (Star Campaigners) यादीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांना स्थान मिळाले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशाच्या मैदानात या दोघी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतं मागण्यासाठी जाणार आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत सलमान खुर्शिद, भुपेश बघेल, राज बब्बर या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. (UP Election Update)

Varsha Gaikwad, Praniti Shinde
काँग्रेसला मोठा धक्का; तिकीट दिल्यानंतर तीन उमेदवारांची पक्षाला सोडचिठ्ठी

त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कन्हैया कुमार यालाही स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आलं आहे. या यादीत सचिन पायलट, हार्दिक पटेल, भुपेंदर सिंग हुडा या नेत्यांच्या तोफाही उत्तर प्रदेशात धडाडणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी याआधीही उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्यासोबत काम केले आहे. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडमध्ये स्थान देण्यात आलं होतं.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. निवडणुकीआधीच त्यांच्या मोहरे हातातून निसटू लागल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे दिग्गज उमेदवारच आता साथ सोडत इतर पक्षांची ताकद वाढवताना दिसत आहेत. आतापर्यंत तिघांनी पक्षाची उमदेवारी नाकारत इतर पक्षांचे तिकीट मिळवले आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काँग्रेसची स्थिती फारशी चांगली आहे.

Varsha Gaikwad, Praniti Shinde
राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराविरोधात शिवसेना मैदानात

राज्यात पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रियांका यांनी खूप मेहनत घेतली आहे. पण निवडणुकीआधी सुरू असलेली पडझड अजूनही थांबलेली नाही. तिकीट जाहीर झाल्यानंतर तीन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने आता उमेदवारी निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. काँग्रेसची पोस्टर गर्ल (Poster Girl) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका मौर्य यांनीही त्यावरच बोट ठेवत पक्ष सोडला आहे. (UP Election 2022)

तिकीट जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी रामपुरमधील चमरौआ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युसूफ अली यांनी पक्ष सोडला. त्यानंतर याच जिल्ह्यातील स्वार-टांडा मतदारसंघातील हैदर अली खान उर्फ हमजा मियां यांनी साथ सोडली. त्यानंतर बरेली कैंट येथील उमेदवार सुप्रिया ऐरन यांनी पक्षाल सोडचिठ्ठी दिली. तिघेही उमेदवारांची त्यांच्या भागात मोठा दबदबा आहे. पक्षाला अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com