Rahul Gandhi Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचं 'मिशन महाराष्ट्र'! राहुल गांधींचा लवकरच दौरा...

Congress Political News : 'भारत जोडो'च्या धर्तीवर राज्यात बस यात्रा काढणार
Rahul Gandhi on Karnataka Election 2023:
Rahul Gandhi on Karnataka Election 2023: Sarkarnama
Published on
Updated on

Delhi : महाराष्ट्रात एका वर्षाच्या अंतरानं शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्यानंतर पुढचा नंबर आता काँग्रेसचा असणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस चांगलाच सतर्क झाला आहे. आगामी निवडणुकांच्या धर्तीवर काँग्रेसकडून आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या मिशन ४८ विरोधात आव्हान देण्यासाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेस(Congress) पक्षाची मंगळवारी(दि.११) एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Gandhi on Karnataka Election 2023:
Congress Meeting: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत काँग्रेस नेत्यांची दिल्लीत चार तास खलबतं; हायकमांडने दिला 'हा' सल्ला

राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्र दौरा करणार आहेत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पटोले म्हणाले,राहुल गांधी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा करतील. त्यांच्या महाराष्ट्रात मुंबई, कोकण अशा सहा विभागांत सभा होणार आहेत. या सभेला मल्लिकार्जून खर्गे, वेणुगोपाल राव, प्रियंका गांधी हे उपस्थित राहणार आहे असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितले.

Rahul Gandhi on Karnataka Election 2023:
MP Amol Kolhe News : फुटीनंतर राष्ट्रवादी अॅक्टिव्ह मोडवर; खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी

'भारत जोडो'च्या धर्तीवर राज्यात बस यात्रा काढणार

राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या धर्तीवर महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर काँग्रेस पक्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच त्यांनंतर बस यात्रा काढण्यात येणार आहे. ही बस यात्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो(Bharat Jodo) यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या घटनेची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने देखील घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. तसेच आता काँग्रेस पक्षातही घडामोडींना वेग आला आहे.

Rahul Gandhi on Karnataka Election 2023:
Maharashtra Politic's : राजकीय गाठीभेटींना वेग, फडणवीसांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चा;अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रिपदे

राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात जबरदस्त तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी पाहता आता काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते महाराष्ट्रात शड्डू ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com