Constitution Day 2022 : विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अजितदादांनी केले संविधान उद्देशिकेचे वाचन

Constitution Day 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निमित्ताने निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली.
Constitution Day 2022 ajit pawar
Constitution Day 2022 ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Constitution Day 2022: दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. सामाजिक न्याय मत्रालयाने 19 नोव्हेंबरला हा निर्णय घेतला होता. 26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही (Democracy of India) इतिहासात अतिशय खास मानला जातो. या दिवशी भारतीय लोकशाहीचा पाया रचला गेला. (Constitution Day 2022 news update)

या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान सभेने (Constituent Assembly) 1949 मध्ये राज्यघटना स्वीकारली. भारतात दरवर्षी आजचा दिवस संविधान दिवस (Constitution Day of India) म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान दिनानिमित्त शनिवारी बारामती शारदानगर येथे राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यासोबत संविधान उद्देशिकेचे सामूहिक पद्धतीने वाचन केले.

अजित पवार म्हणाले, "भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत, राजकीय संहिता संरचना , कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्य निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे,"

Constitution Day 2022 ajit pawar
Rupali Chakankar : महिलांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांना महिला आयोगाचा दणका

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निमित्ताने निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चा नंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 19 49 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो," असे अजित पवार म्हणाले.

Constitution Day 2022 ajit pawar
Ajit Pawar : शिंदे आता कुणाचा बळी द्यायला गुवाहाटीला जाताहेत.. ; अजितदादांचा टोमणा

यावेळी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, बारामती तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी कार्यकर्ते रविराज तावरे,माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता काळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील पावडे, एग्रीकल्चर ट्रस्टचे सीईओ निलेश नलवडे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे, अश्विन पवार, उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com