Navneet Rana : मतदानादिवशीच नवनीत राणांना झटका, हनुमान चालिसा पठणप्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून शुक्रवारी आठ मतदारसंघात मतदान झाले. यात भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांचा अमरावती मतदारसंघाचाही समावेश होता.
Navneet Rana, Ravi Rana
Navneet Rana, Ravi RanaSarkarnama

Mumbai Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या निवासस्थानी 'मातोश्री' बाहेर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले होते. ते प्रकरण राणा दाम्पत्याची पाठ सोडताना दिसत नाही. अमरावती या लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असतानाच कोर्टाने नवनीत राणांना Navneet Rana झटका दिला आहे. हनुमान चालिसा पठणप्रकणी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाने राणा दाम्पत्यांना दिले आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून शुक्रवारी आठ मतदारसंघात मतदान झाले. यात भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांचा अमरावती मतदारसंघाचाही समावेश होता. मतदारसंघात लोकसभेचा उत्सह सुरू असतानाच राणांना मुंबई सत्र न्यायालयाने हनुमान चालिसा पठणप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणप्रकरणी नवनीत राणांविरोधात मुंबईच्या स्थानिक कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी 9 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीला राणांनी हजर राहावे, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana, Ravi Rana
Eknath Shinde : मंडलिक, मानेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे बेरजेचे गणित; कोल्हापुरात ठरणार रणनीती

काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या निवासस्थान 'मातोश्री'बाहेर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले होते. प्रशासनाने मनाई केल्यानंतरही त्यांनी त्यांचा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. तसेच माध्यमांतही प्रक्षोभक विधाने केली होती. या प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी Mumbai Police राजद्रोहासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यावर गुन्हा रद्द करण्याची मागणीची याचिकाही कोर्टाने फेटाळली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Navneet Rana, Ravi Rana
Naseem Khan Resign News : काँग्रेसला धक्का; नाराज नसीम खान यांचा मोठा निर्णय; 'या' पदाचा दिला राजीनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com