Devendra Fadnavis News: 'मिशन 45' साठी फडणवीसांनी विस्तारकांना सांगितला प्लॅन; म्हणाले, 'पुढील एक वर्षाचा...'

BJP : विस्तारकांचा सोमवारी मुंबईत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जोरदार तयारीला लागले आहे. भाजपने पक्ष संघटना वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या देत बैठकांचा सध्या धडाका सुरू केला आहे. याच अनुषंगाने सोमवारी विस्तारकांचा मुंबईत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना मार्गदर्शन करत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

"भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी स्वतःसाठी 10 तास आणि पक्षासाठी 14 तास वेळ द्या, प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्ह्यातील प्रभावित व्यक्तींशी संपर्क करून संवाद साधा. तसेच पुढील एका वर्षाचा 'रोडमॅप' तयार करा, अशा सूचनाच फडणवीसांनी विस्तारकांना दिल्या आहेत. याबरोबरच भाजप नेहमीच बॉस राहिला पाहिजे, त्यासाठी विस्तारकांनी पक्षासाठी जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे", असं फडणवीसांनी विस्तारकांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
BJP Vs Nitin Deshmukh : फडणवीसांना फडतूस म्हणणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना भाजपचा इशारा; म्हणाले...

महाराष्ट्रात लोकसभेसाठी भाजपने 'मिशन 45'ची घोषणा काही महिन्यांपूर्वीच केलेली आहे. या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' यशस्वी करण्यासाठी भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या प्रशिक्षण वर्गात विस्तारकांना मार्गदर्शन केले. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची रणनीती कशी असणार, याबाबत सांगत 'मिशन 45' पूर्ण यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.

दरम्यान, "युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचेही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर असून, पक्ष प्रथम आणि मी शेवटी हेच धोरण आपण ठरवायला हवं, या ठिकाणी मी उभा आहे ते पक्षामुळेच ", असंही फडणवीस या वेळी म्हणाले. त्यामुळे आता या विस्तारकांच्या बैठकीवरून भाजप जोरदार कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Devendra Fadnavis
BJP Vs Nitin Deshmukh : फडणवीसांना फडतूस म्हणणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना भाजपचा इशारा; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com