Crime : मुंबईत पुन्हा 1993 सारखा दहशतवादी हल्ला होणार; मुंबई पोलिसांना फोन अन्...

Mumbai Police News: या स्फोटानंतरही राज्यात दंगली घडतील असाही खळबळजनक दावा
Mumbai crime news, police
Mumbai crime news, police Satrkarnama
Published on
Updated on

Mumbai Police News :महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा १९९३ सालच्या बाँम्बस्फोटासारखा दहशतवादी हल्ला होणार असल्याचा निनावी फोन मुंबई शहर पोलिसांना रविवारी (दि.८) आला. या फोननंतर एकच खळबळ उडाली. सर्व तपासयंत्रणा अलर्ट झाल्या. आणि तपासाची सूत्रे वेगानं फिरली. पोलिसांची मोठी धावपळ सुरु झाली. काहीवेळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मात्र, काही वेळातच दहशतवादविरोधी पथकाने (ATS) फोन करणार्या व्यक्तीचा छडा लावत त्याला बेड्या ठोकल्या.

Mumbai crime news, police
Sharad Pawar News : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास; पवार-फडणवीसांना म्हणाले...

दहशतविरोधी पथकानं याप्रकरणी एकाला अटक केली आहे. नबी खाना उर्फ केजीएन लाला (वय५५) याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक निनावी फोन आला होता. हा फोन करणार्या व्यक्तीने १९९३ साली मुंबईत घडवण्यात आलेल्या स्फोटाप्रमाणेच घातपाताचा इशारा दिला होता. तसेच तसेच या स्फोटानंतरही राज्यात दंगली घडतील असा खळबळजनक दावा केला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलीस, दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सूत्रं वेगानं फिरवली. यानंतर पोलिसांनी मालाडच्या पठाणवाडी परिसरातून फोन करणार्या आरोपी नबी खाना उर्फ केजीएन लाला याला ताब्यात घेत अटक केली आहे.

Mumbai crime news, police
Raj Thackeray News : राणे-राऊत काय बोलले हेच सुरु असतं, पवार मध्येच बोलतात, यामुळे मी काहीही बोलत नाही..

यापूर्वीही मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता...

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात गेली होती. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला होता. हा हल्ला दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्यानं करण्यात येणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. तसेच गुप्तचर यंत्रणाही पूर्णपणे सतर्क झाल्या असून मुंबईतील अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती.

मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर मुंबईतील प्रमुख ठिकाणांसह दहशतवादी व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत सध्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com