शिंदेंकडून 50 लाखांचा निधी घेत नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश; गणेश नाईकांमुळे वादाची पहिली ठिणगी

नवी मुंबईमध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या तीन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश...
Ganesh Naik Latest News, CM Eknath shinde News, BJP News
Ganesh Naik Latest News, CM Eknath shinde News, BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राज्यभरातील पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. नवी मुंबईतील काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला होता. पण आता त्यातील तिघांनी नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या पुढाकारातून झालेल्या या प्रवेशावर शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (BJP Latest Marathi News)

नाईक यांच्या या खेळीमुळे नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये गेलेल्या माजी नगरसेवकांनी नगरविकास खात्याकडून 50-50 लाख रुपयांचा निधी काही दिवसांपूर्वीच मंजूर करून घेतला होता, असा दावाही शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे.

Ganesh Naik Latest News, CM Eknath shinde News, BJP News
Shiv Sena : एकनाथ शिंदेनी दिल्लीत बसून घातला शेवटचा घाव; शिवसेनेवर ठोकला दावा

याविषयी नाराजी व्यक्त करताना नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले म्हणाले, आज शिंदे व फडणवीसांच्या माध्यमातून युती सरकार आले आहे. असे असताना काही गोष्टी घडू नयेत. नव्या मुंबईचे नेतृत्व जे करतात, ते राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत, त्यांनी या गोष्टी करायला नको होते. त्यांचे टायमिंग चुकले, अशी टीका चौगुले यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता केली.

आम्हालाही ते जाणार हे माहिती होते. पण अशावेळी त्यांनी या गोष्टी घडवून आणले, हे चुकीचे आहे. ते स्वगृही परतले असे म्हणत असले तरी त्यावर आमचा आक्षेप नाही. पण सध्या राज्यात जी राजकीय स्थिती आहे, त्यापार्श्वभूमीवर या गोष्टी व्हायला नको होत्या. हे चुकीचे आहे. पंधरा तारखेलाच त्यांनी नगरविकास खात्याकडून 50-50 लाखांचा निधी घेतला आहे. त्यामुळे कुणावर दोषारोप ठेवून जाऊ नये. आनंदाने जावे, आम्हीही अडवले नसते. हा आम्हाला धक्का नाही. आम्ही धक्के द्यायला लागलो तर भारी पडेल, असा सूचक इशाराही चौगुले यांनी दिला.

Ganesh Naik Latest News, CM Eknath shinde News, BJP News
SC Hearing on Shiv Sena : सुनावणी एक ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली; 27 जुलैपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

दरम्यान, नवी मुंबईत डिसेंबर 2021 मध्ये भाजप नगरसेवकांची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रांग लावली होती. त्यावेळी भाजपच्या जवळपास 14 नगरसेवक आणि नगरसेविका शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. यावेळी नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हेदेखील शिवसेनेत दाखल झाले होते. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com