Naughty नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले...अमृता फडणविसांनी नेत्यांना डिवचले!

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नियमीत अॅक्टिव्ह असतात.
amruita fadnavis
amruita fadnavissarkarnama

मुंबई : राज्य सरकारने किराणा दुकांमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपने या निर्णयावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) कडाडून हल्ला केला आहे. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruita fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.

amruita fadnavis
वाईन विक्रीच्या धोरणावर आठवले म्हणाले, किराणा दुकानात आला दारूचा माल...

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नियमीत अॅक्टिव्ह असतात. अनेकदा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतात. मात्र, आता त्यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी नेत्यांना डिवचले आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ''थोडक्यात उत्तर द्यावे ...५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले.....या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स !_____शराब नही होती ! हरामखोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है!'' अशा खरमरीत भाषेत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

amruita fadnavis
‘वाईन’मुळे महाराज्य ‘मद्यराष्ट्र’ होईल असं बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण!

काय म्हणाले होते फडणवीस?

वाईनविक्रीबाबतचा निर्णय कुणाच्या हितासाठी घेण्यात आला आहे. काही लोक गोंडसपणे शेतकऱ्यांचे नाव पुढे करत आहेत. पण, हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही. काहींनी दारूच्या कंपन्या किंवा एजन्सी नव्याने घेतल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. हा निर्णय अशा लोकांच्या भल्याकरताच घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती बैठक कुठे झाली? विदेशात झाली का? असाही प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. हा काही साधासुधा निर्णय नाही, तर याच्यामागे फार मोठे अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचे स्वप्न या सरकारचे दिसत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी वाईनविक्री परवानगीच्या निर्णयानंतर म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com