दिवाळीच्या तोंडावर आणखी एका संकटाचे सावट : अजित पवारांकडून सतर्कतेचा इशारा

Ajit Pawar | परतीच्या पावसाने राज्यातील शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
Ajit Pawar |
Ajit Pawar |Sarkarnama

Punerain मुंबई : कालच्या पावसाने पुण्यातल्या अनेक भागात रस्ते जलमय झाले. संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने शहराच मोठं नुकसान झालं आहे. त्यातच बंगाल महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या उत्तर आणि दक्षिण भागात चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसाने राज्यातील शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यातल्या कालच्या पावसानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव तर मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना लातूर या 10 जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालंच, पण शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला. तर आता या परतीच्यापावसाने रब्बीच्या पिकानांही फटका बसला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करणार असल्याचे मागे जाहीर केलं होतं. पण ते अजूनही ते झालेले नाही.

Ajit Pawar |
अक्कलकुव्यात काँग्रेस-शिवसेनेचा; भाजपची निराशा

पुण्यात काल परतीच्या पावसाने शहरात मोठे नुकसान झाले आहे. काल दगडूशेठ मंदीरातही पाणी शिरलं, मानाच गणपकी भाऊ रंगारी मंदीरातही पावसाचं पाणी शिरलं. मंदीरातल्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत पाणी काढण्याच काम केलं. हे पाहता पुण्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होते. या पावसाचा शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच या पावसामुळे रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. अनेक काम बंद पडलीत. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. कित्येक लोकांच्या घरादारात पाणी शिरलं. पण प्रशासनाकडून ज्या गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं तेवढ्या गांभीर्याने लक्ष दिलं जात नसल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. या सर्वांना तातडीने काही मदत दिली जावी अशी मागणी अजित पवारांकडून करण्यात आली आहे.

काल औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. 'आम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. कोणी विचारायला गेले तर कोणी दखलसुद्धा घेत नाही. अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी अजित पवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com