मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोळे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या दोघांचाही मृत्यू झाला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोघांचंही शवविच्छेदन करण्यात आलं.
पहिल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, अपघातामुळे सायरस मिस्त्री यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. डोक्यालाही जबदस्त मार लागला होता. याला वैद्यकीय भाषेत पॉलीट्रॉमा असं म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कासा पोलीस स्टेशनला पाठवला आहे.
सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक परदेशात राहत असल्याने आज रात्री उशिरापर्यंत ते मुंबईत पोहोचतील. त्यामुळे सायरस यांच्या पार्थिवावर मंगळवारी (६ सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सायरस मिस्त्री (५४) यांचे रविवारी दुपारी एक रस्ते अपघातात निधन झाले. ते अहमदाबादहून मुंबईला निघाले होते. पण पालघरजवळ पोहचताच त्यांची कार दुभाजकाला धडकली. कारमध्ये एकूण चार जण होते. मिस्त्री यांच्याशिवाय मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती डेरियस पांडोळे आणि डेरियस यांचे भाऊ जहांगीर पांडोळे हे देखील गाडीत होते. डॉ. अनाहिता पांडोळे सायरस मिस्त्री यांची गाडी चालवत होत्या. पण हा अपघात इतका भीषण होता की मर्सिडीज सारख्या गाडीत बसूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. या अपघातानंतर कंपन्यांच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी वेगाने जात होती की कारने 9 मिनिटांत 20 किमी अंतर कापले होते. हा अपघात दुपारी 3.15 वाजता झाला. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात होते. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. अपघातात डॉ. अनाहिता पांडोळे (55) आणि त्यांचे पती डेरियस पांडोळे (60) हे या अपघातातून बचावले, पण मिस्त्री (54) आणि डेरियस यांचे भाऊ जहांगीर पांडोळे यांचा जागीच मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.