भाजप आमदार समाधान आवताडेंना धक्का; 'दामाजी'वर समविचारी गटाची सत्ता

आमदार आवताडे गटाला २१ पैकी फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
 Damaji Sugar Factory Election Results
Damaji Sugar Factory Election Results sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार समाधान आवताडेंसह त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. (Damaji Sugar Factory Election Results)

आमदार आवताडे यांच्या विरोधात आलेल्या समविचारी गटाने कारखान्यावर सत्ता मिळविली आहे‌. आमदार आवताडे गटाला २१ पैकी फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निकाल जाहीर होताच समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली.

काल (गुरुवारी)सकाळी मतमोजणी सुरू झाली.सुरवातीपासूनच समविचाराचे उमेदवार आघाडीवर राहिले. रात्री उशिरा मतमोजणी संपली. त्यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार समाधान आवताडे, उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांच्यासह जवळपास दहा संचालकांनाचा पराभव झाला आहे.

 Damaji Sugar Factory Election Results
शिवसेनेला आणखी मोठं खिंडार ; मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवक शिंदे गटात

समविचारी गटातून तानाजी खरात, शिवानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार, तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे हे तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील , भारत बेदरे , माजी सभापती निर्मला काकडे , लता कोळेकर , तर राजेद्र पाटील , महादेव लुगडे, माजी संचालक बसवराज पाटील , भिवा दौलतडे, मुरलीधर दत्तू , दयानंद सोनगे, रेवणसिद्ध लिगाडे, तानाजी कांबळे हे विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com