Dasara Melava 2023 : मराठ्यांविरोधात काश्मीरप्रमाणे गोळीच्या पुंगळ्या वापरल्याचे सांगत उद्धव ठाकरेंची जरांगेंना ताकद

Shivaji Park Dasara Melava 2023 : त्या मधील पुंगळ्या मला जरांगे-पाटलांनी दाखवल्या, असे सांगून ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

सचिन वाघमारे

Thackeray Group Dasara Melava : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरच्या दसऱ्यातून जबरदस्त डाव टाकून, मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना ताकद दिली. मराठा आरक्षण, सराटीतील पोलिसांचा लाठीमार, त्यानंतरची टोलवाटोलवीचे मुद्दे हातात घेऊन ठाकरेंनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जम्मू-काश्मीरमध्ये वापरतात, त्या गोळीच्या पुंगळ्या वापरल्या. त्यामधील पुंगळ्या मला जरांगे-पाटलांनी दाखवल्या, असे सांगून ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेच्या या मेळाव्याला ५७ वर्षे झाली. ही ५७ वर्षांची परंपरा जपली आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

Uddhav Thackeray
Shivsena UBT Dasara Melava 2023: 'खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे'; ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

आंदोलकांवर गोळीबार करणारा जनरल डायर कोण?

जालन्यातील अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करीत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला होता. या ठिकाणी पोलिसांना गोळीबार करण्यास सांगणारा जनरल डायर कोण, याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी. त्यासोबतच या गद्दारांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray
Shivsena Dasara Melava 2023 : अब की बार ठाकरे सरकार..., हिंमत असेल तर टक्कर द्या; राऊतांचं मोदी, शाहना आव्हान

जरांगे-पाटलांनी मंगळवारी चौंडीत जाऊन धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावयास हवे, असे सांगून त्यांनी सध्या गाजत असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उचलून सत्ताधारी मंडळींना चांगलेच अडचणीत आणले. आरक्षणाचा हा प्रश्न लोकसभेत सोडवण्यासाठी भाजपने प्रयत्न करायला हवे होते. विशेष अधिवेशनात हा प्रश्न मांडता आला असता. मात्र, त्याकडे भाजपने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com