Monsoon Session of Maharashtra Assembly: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

Maharashtra Legislature Monsoon Session: कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Monsoon Session of Maharashtra Assembly
Monsoon Session of Maharashtra AssemblySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Monsoon Session: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १७ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण राज्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच अधिवेशनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार येत्या १७ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी आज (७ जुलै) सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) या बैठकीला उपस्थित होते. 

Monsoon Session of Maharashtra Assembly
Sharad Pawar Cancel All Tours : शरद पवारांचे सर्व दौरे रद्द? कारण..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार सत्तेत सामील झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंबामुळे राज्य सरकारला अधिक बळकटी मिळाली आहे. पण दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र कमजोर होत चालल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षानेही चांगलीच तयारी केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अजित पवार यांच्याकडे राज्याचं विरोधी पक्षनेते पद होतं. पण आता अजित पवार स्व:तच सत्तेत सामील झाल्यामुळे विरोधी पक्षनेते पद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra politics) अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊ आणि ज्यांची संख्या जास्त असेल त्या पक्षाकडे विधानसभेच विरोधी पक्षनेते पद जाईल. असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. 

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com