Mumbai News : फडणवीसांची मोठी घोषणा ; झोपडपट्टीधारकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, अडीच लाखात..

House In 2.5 Lakh Slum Holders Mumbai : पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्याबाबचा निर्णय जाहीर
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis Big Announcement : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील (Mumbai)झोपडपट्टीधारकांसाठी (Slum Holders) एक गुड न्यूज दिली आहे.

याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना फक्त अडीच लाखांमध्ये (2.5 Lakh) घर देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यामुळे मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिका आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीधारकांना आकर्षक

Devendra Fadnavis
Maharashtra Board HSC Result : असाही योगायोग ! वडिलांनीच जाहीर केला मुलीचा बारावीचा निकाल; असं काय झालं ?

पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन अध्यादेश काढण्यात आला आहे.

यासंदर्भात झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती.

विधिमंडळाच्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्याबाबतचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

Devendra Fadnavis
IPL Cricket Betting News : 'आयपीएल' क्रिकेट मॅचवर 'बेटिंग' घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

त्यानंतर काल (गुरुवारी) राज्य सरकारने झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्याबाबचा निर्णय जाहीर केला आहे. एक जानेवारी 2000 ते एक जानेवारी 2011 या काळातील झोपडपट्टीधारकांसाठी हा आदेश लागू होणार आहे. त्यामुळे या काळातील झोपडपट्टीधारकांचे मुंबईत (Mumbai) घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडीच्या संदर्भात त्या झोपडीत राहणाऱ्या झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

फडणवीसांनी करुन दाखवलं..

ठाकरेंना जे जमले नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com