धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते!

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Arvind Sawant, balasaheb thackeray
Arvind Sawant, balasaheb thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (shiv sena chief balasaheb thackeray) यांचा आज नववा पुण्यस्मरण दिवस. यानिमित्ताने शिवसेनेर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.

स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली असून त्यासमोर फुलांची सजावट करून आरास करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेतेही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतिर्थावर उपस्थित राहणार आहेत.यानिमित्ताने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अरविंद सावंत म्हणाले, ''बाळासाहेबांनी जातीविरहीत राजकारण केलं. त्यांनी एकात्मतेची माळ जपली. 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,' असं ते म्हणायचे तेव्हा एक आवाज उफाळून यायचा. न्यायालयात धर्म, जात विचारून जे धर्म ग्रंथ दाखवले जातात ते बाजूला काढा असे ते म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्याची साक्ष घ्या, असे त्यांचे मत होते. धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते.''

''भाजप जातीयवादी पक्ष आहे. ज्यांच्या पोटात आणि ओठात जातीय वाद आहे. दांभिक कोण आणि खरे कोण हे लोकांना कळतं, '' अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले, ''नको त्या माणसाला किंमत द्यायची गरज नाही,''

Arvind Sawant, balasaheb thackeray
कंगना पुन्हा बरळली ; म्हणाली, ''भगतसिंगांना फाशी द्यावी अशी गांधींची इच्छा होती''

कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपले निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळीचे दर्शन घेत त्यांनी आदरांजली अर्पण केली. मात्र यंदा कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे राज्यातील शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्यापार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com