मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. वानखेडेंना सोशल मीडियांच्या माध्यमातून ही धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मेसेजमध्ये "तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पड़ेगा. तुमको खत्म कर देंगे," असे टि्वटरच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.
ट्विटरवर वानखेडेंना धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर वानखेडेंनी या धमकीच्या ट्विटविषयी गोरेगाव पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिस तपासात ज्या व्यक्तीने टि्वट करुन वानखेडेंना धमकी दिली होती हे अकाऊन्ट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते. आरोपीने वानखडे यांना टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते टि्वट डिलिट केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात समीर वानखेडे यांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे.
महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडेंनी हा खटला दाखल केला.वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात मंत्री असताना वानखेडे यांच्यावर एससी-एसटीची बनावट कागदपत्रे बनवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.