Eknath Shinde : शिंदे सरकारचा गोविंदांसाठी आणखी एक मोठा निर्णय

Eknath Shinde : दहीहंडीत कार्यक्रमात कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडी खेळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गोपाळकाल्याच्या पूर्वसंध्येला काल (गुरुवारी) विधानसभेत केली. त्यानंतर अजून एक महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

दहीहंडीत कार्यक्रमात कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवारी) विधानसभेत केली होती.

Eknath Shinde
गोविंदांसाठी खुशखबर; शासकीय नोकऱ्यात आरक्षण अन् दहा लाखाचे सरक्षण

राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील, असे कळविण्यात आले आहे.

गोविंदांना आता शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांत 5 टक्के आरक्षणांतर्गत लाभ मिळणार आहे. यासोबतच शासकीय स्तरावरही दहीहंडी खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. दहीहंडीच्या “प्रो गोविंदा” स्पर्धांच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com