पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी : मुंबई पोलीस हाय अलर्टवर

PM Narendra Modi | धमकीचा ऑडिओ संदेश पाठवणाऱ्याने दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांची नावेही दिली आहेत
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama

PM Narendra Modi मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रुमच्या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे आतापर्यंत आतापर्यंत 19 ऑडिओ क्लिप आणि 20 मेसेज पाठवण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माणसं पंतप्रधान मोदींची हत्या करतील, असे मेसेज पाठवले जात आहे. या मेसेजमुळ पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवला आहे. धमकीचा ऑडिओ संदेश पाठवणाऱ्याने दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांची नावेही दिली आहेत, ज्यांना पंतप्रधान मोदींच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुस्तफा अहमद आणि नवाज अशी त्यांची नावे आहेत. मात्र ऑडिओ मेसेज पाठवणाऱ्याने त्याचे नाव उघड केलेले नाही. ही ऑडिओ क्लिप हिंदीत आहे.

PM Narendra Modi Latest Marathi News
Uday Samant News : राजन साळवींबाबत उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी एका हिरे व्यापाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये एक फोटोही पाठवण्यात आला आहे. हा फोटोही देण्यात आला असून ही व्यक्ती संबंधित हिरे व्यापाऱ्याकडे काम करायची. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात असाच एक धमकीचा फोन आला होता. पाकिस्तानातून आलेल्या या कॉलमध्ये २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, अशाच आणखी एका कॉलमध्ये अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूमधील पीव्हीआर आणि सांताक्रूझमधील फाइव्ह स्टार हॉटेल सहार यांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर हा कॉल आला होता. अशा धमक्यांच्या मालिकांमुळे मुंबई पोलिसही अलर्ट मोडवर आले आहेत,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com