Nitin Raut News : विधानसभेत दीक्षाभूमी पार्किंग वादाचे पडसाद; नितीन राऊतांनी सरकारला धरले धारेवर

Deekshabhoomi Under Ground Parking Issue : नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला वादाचे वळण लागले आहे. या आंदोलनाचे पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरले.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama

Nagpur News : नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला वादाचे वळण लागले आहे. दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली आहे.

या ठिकाणच्या इतर विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे नागपूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाचे पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. (Nitin Raut News)

दीक्षाभूमीवरील पार्किंगला विरोध करण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचे पडसाद आता विधानसभेत उमटले असून या आंदोलनामुळे काँग्रेसचे (Congress) आमदार नितीन राऊत (Nitin Raut ) यांनी महायुती सरकरला धारेवर धरले. त्यानंतर यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देत या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

Nitin Raut
Video Deekshabhoomi Parking Issue : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध, बांधकाम साहित्य फेकले

दरम्यान, राज्य शासनाकडून नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी 200 कोटीची वेगवेगळी विकास कामे सुरु आहेत. मात्र यातील अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे.

अंडरग्राऊंड पार्किंग विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी आंदोलकांनी आंदोल करीत काम बंद पाडले.

Nitin Raut
Sambhaji Bhide News : '..त्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये' ; संभाजी भिडेंच्या विधानाने पुन्हा वाद उफळण्याची चिन्हं!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com