Deepak kesarkar : आमच्यासोबत या, शेवट गोड करू ; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंनाच ऑफर

Deepak kesarkar |उद्धव ठाकरेंपेक्षा पक्षात एकनाथ शिंदेंना बंडखोर आमदारांनी मोठे पद अन् मान दिल्याचेही एका शब्दांत दिसून आले.
deepak kesarkar, uddhav thackeray
deepak kesarkar, uddhav thackeraysarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना राजकीय नेत्यांसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनीही उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) शुभेच्छा दिल्या आहेत. "पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान आहे, तेव्हाही होता, आजही आहे,’ अशा शब्दात केसरकरांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. (Deepak kesarkar latest news)

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्व जपता आले पाहिजे असा टोमणा लगावला आहे. तर आज बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या (aditya thackeray) पुन्हा निवडणूक लढवण्याचा मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरेंनी निवडून येण्यासाठी मतदारसंघातील 2 माजी आमदारांना विधान परिषदेचे सदस्य करावे लागले यातच सगळे आल्याची खरपूस टीका दीपक केसरकरांनी केली आहे.

केसरकर म्हणाले, "आज चांगला दिवस आहे. उद्धवसाहेबांचा आज वाढदिवस आहे. मी एकनाथ शिंदे आणि आमच्या आमदारांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगलं काम होवो ही शुभेच्छा. आमचा विषय हा वैचारिक मुद्द्यांचा आहे," केसरकर पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी मुलाखत पाहिली का? असे विचारला असता ते म्हणाले, "अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ नये. ज्या प्रश्नातून चुकीची रिअॅक्शन किंवा चुकीचा मेसेज लोकांमध्ये जाता कामा नये असं मला वाटतं. मी काही मुद्द्यांच्या आधारे उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेईन. आज वाढदिवस आहे, चांगला दिवस आहे," "शिंदे यांनी कोविड काळात चांगलं काम केलं. त्यांना दोन वेळा कोरोना झाला. ते ग्राऊंडवर राहून कामकाज पाहत होते. आमचं सरकार हे लोकांसाठी समर्पित सरकार आहे," असा दावाही केसरकर यांनी केला.

deepak kesarkar, uddhav thackeray
Jitendra awhad : शरद पवार यांनी आव्हाडांना एकटे पाडलयं ?

ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना शिंदे आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला आहे. त्याऐवजी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे. या दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अमान्य आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

"माजी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करणे हे अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून शुभेच्छा देताना तसा उल्लेख केला पक्षप्रमुख पद हे पक्षापूरते मर्यादित असते तर मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी असते असे म्हणत हे मुख्यमंत्रिपद हे शिवसेना प्रमुख पदापेक्षा मोठे पद असल्याचा टोला केसरकरांनी लगावला आहे. यामुळे गैरसमज करून घेऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.

पक्षप्रमुखपद स्वीकारा

"आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, त्यात आम्ही पक्षप्रमुख पदावर कुणाची नियुक्ती केली नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि पक्षप्रमुखपद स्वीकारावे अशी ऑफरच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे. आम्हाला या सर्व गोष्ट्रीचा शेवट गोड व्हावा असे वाटते आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख पदापेक्षा राज्याचे मुख्यमंत्रीपद मोठे आहे. असेही दीपक केसरकरांनी म्हटले आहे. आता उद्धव ठाकरेंपेक्षा पक्षात एकनाथ शिंदेंना बंडखोर आमदारांनी मोठे पद अन् मान दिल्याचेही एका शब्दांत दिसून आले.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

"कॅबिनेटचा विस्तार करण्यासाठी काही अडचणी नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसताना देखील जनतेच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. काही जण दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीला जातात त्यात काही गैर नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला भाजपच्या श्रेष्ठींना भेटायला जातात यात काही गैर नाही," असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com