Mumbai NCP News : सावित्रीबाई फुलेंची बदनामी; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली 'ही' मागणी

Mumbai Police Commissioner : लेखकांवर कठोर कारवाईची मुंबई आयुक्तांकडे मागणी
NCP Leaders meets Mumbai Commissioner
NCP Leaders meets Mumbai CommissionerSarkarnama

NCP Agitation in Mumbai : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध करण्यात आला. या वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना निवेदन दिले. त्यावर संबंधित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन फणसाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

NCP Leaders meets Mumbai Commissioner
Ambadas Danve On Shinde Sena : आमची शिवसेना बाळासाहेबांची, तुमच्या सेनेचा माय-बाप कोण ?

मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसआणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "मुंबई पोलिसांनी अनेक प्रकरणात काही तासांत कारवाई केली आहे. त्यामुळे आता सावित्रीबाई फुलेंची बदनामी केलेल्या प्रकरणातही लक्ष घालून कडक कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना केली आहे. अन्यथा यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन महाराष्ट्रात करणार आहोत." तर महापुरुषांवर गरळ ओकणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयुक्तांकडे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) निवेदनात म्हटले की, " इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आहे."

NCP Leaders meets Mumbai Commissioner
Maval Loksabha News: राष्ट्रवादीचा मावळ लोकसभेवर दावा; ठाकरे गट तो मान्य करणार का ?

संबंधितांनी अनेक महापुरुषांवर एकतर्फी लेख लिहिल्याचा आरोपही या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल आहे. निवेदनात म्हटले की, "इंडिक टेल्स वेबसाईटवरील लेख मुखरनीना या नावाने नीना मुखर्जी यांनी पोस्ट केला आहे. या लेखाचे क्रेडीट भारद्वाज नावाच्या व्यक्तीस दिले आहे. भारद्वाज नावाच्या व्यक्तीचे ट्विटर तपासले तर त्याने महात्मा गांधींपासून ते इतर अनेक महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह्य लिखाण केल्याचे दिसून येते."

महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लेखांतून सामजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू असल्याचेही निवदेनात नमूद केले आहे. निवेदनात म्हटले की, महापुरुषांचा अपमान करुन सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचा उद्देश लेखांमागे आहे. विविध जाती किंवा समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना, दृष्टावा निर्माण व्हावा असेच कृत्य संबंधितांनी केले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामीचा विषय शासनाने गांभीर्याने घ्यावा. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com