Ajit Pawar wrong tweet : 'अॅक्शन मोड'वर आलेल्या अजित पवारांच्या 'ट्विटर' अकाऊंटवरून एकापाठोपाठ चुकीचे ट्विट; आरोग्यमंत्र्यांचं नावच बदललं अन्...

Ajit Pawar wrong tweet is discussed on social media : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मिडीयावरून अशा चुकीच्या माहितीची पोस्ट प्रसिद्ध झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेले हे ट्विट सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.
Ajit Pawar wrong tweet
Ajit Pawar wrong tweetSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेले चुकीचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे करण्यात आलेले ट्विट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या खात्यावरून अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ट्विट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्येक माहितीसाठी अपडेट असतात. प्रत्येक बाबतीत त्यांच्याकडे अत्यंत अद्यावत माहिती उपलब्ध असते, म्हणून अनेकदा त्यांचे कौतुक देखील केले जाते. केवळ मित्रपक्षातील सहकारीच नव्हे तर विरोधी पक्षातील सभासद देखील अजितदादांकडे असलेल्या अद्यावत आणि इत्थंभूत माहितीचे दाखले सदैव देत असतात. अशी स्थिती असतानाच त्यांच्याच सोशल मिडीयावरून अशा चुकीच्या माहितीची पोस्ट प्रसिद्ध झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेले हे ट्विट सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Ajit Pawar wrong tweet
Ajit Pawar NCP : लोकसभेला निराशाजनक कामगिरी; आता अजितदादांचा पहिलाच पण मोठा बदल..

गेल्या आठवड्याच अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांच्याबरोबर 9 जुलैला सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले होते. सर्वजन मंगळवारी गणेशाचे दर्शन घेतात मग आम्ही देखील गणेशाचे दर्शन घेतले. प्रार्थना केली आशीर्वाद मागितले, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर अजितदादांच्या ट्विट अकांउंटवरून याची माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये मुंबईच्या सिद्धिविनायकाचा उल्लेख अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणुन करण्यात आला होता.

त्यानंतर अजित पवार यांनी नुकतीच मुंबईत मंत्रालयात कोल्हापूर जिल्हयातील क्षारपाड जमिनीसंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला पाठींबा जाहीर करणारे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते. या बैठकीची माहिती देखील अजित पवार यांची सोशल मीडियावरून ट्विट करून दिली होती. या ट्विट मध्ये यड्रावकर यांचा उल्लेख आरोग्यमंत्री म्हणुन करण्यात आला होता. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणुन तानाजी सावंत यांच्याऐवजी यड्रावकर यांचाच उल्लेख आरोग्यमंत्री करण्यात आला होता.

Ajit Pawar wrong tweet
Ajit Pawar NCP : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत भूकंप : शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह ‘या’ लोकांनी केला शरद पवार गटात प्रवेश!

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अशा पद्धतीने चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीचे ट्विट केले जात आहेत. त्यामुळे चुकीच्या माहितीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय झाली आहेत. सध्या ही ट्विट सोशल मीडियावर व्हायरल देखील केली जात असल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com