Ajit Pawar Letter : अजित पवारांनी दिवस मोजले अन् हातोहात पत्रच धाडले...

NCP News : अजित पवार यांना सरकारमध्ये सहभागी होऊन १०० दिवस झाले आहेत.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटांतील लढाई केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू झाली आहे. निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या गटातटातील याचिकांवर दोन सुनावण्या झाल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारमध्ये सहभागी होऊन १०० दिवस झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला खुले पत्र लिहिले आहे.

पत्रात काय म्हटले आहे ?

आज १० ऑक्टोबर असून, राष्ट्रवादीला सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने मी पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे. असे निर्णय त्या-त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारमध्ये सहभागी झाला.''

Ajit Pawar News
Manoj Jarange Patil : आवाज मराठ्यांचा! मनोज जरांगेंची सभा होणार दीडशे एकरांत...

आपल्यासाठी वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे सूत्र असेल, असे पवारांनी नमूद केले आहे. प्रत्येक काळ व त्या काळातील आव्हाने वेगळी असतात. त्या आव्हानांचा सामना करत लोककल्याणासाठी लोकप्रतिनिधींना काम करावे लागते. आपण लोकांचे देणे लागतो व त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिले आहे. या भूमिकेवर माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा संपूर्ण विश्वास आहे'' असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेले बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्रदायित्व हे सूत्र माझी पेरणा आहे. राजकारणाच्या पलीकडे भूक, बेरोजगारी व महागाई या प्रश्नांवर राज्य सरकारला काम करावे लागते. त्यासोबतच रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असते. येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचं उद्दिष्ट असते. येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसेच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमाने करणार आहोत.

टीका ही राजकीय नेत्यांच्या जीवनाचा भाग आहे, असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो. मात्र, केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विकासात्मक, राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे, हा माझा काम करण्याचा पिंड आहे, यावर यावर माझा विश्वार आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात भूमिका मांडताना अजित पवार पत्रात म्हणाले, नव्या सरकारमध्ये समील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करीत राहू हा विश्वास मी आज या पत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि साथ अशीच सोबत राहू दे, ही आशा व्यक्त करतो. तूर्तास इतचे. यापुढेही तुमच्याशी हा पत्रसंवाद कायम राहील. या पत्राच्या शेवटी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असे म्हटले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Ajit Pawar News
Akola Politics : रणजित पाटील 'ॲक्टिव्ह मोड'वर; मोठा निर्णय घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com