Raj Thackeray : देशपांडे, जाधव, उंबरकर यांच्याकडे मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी

MNS Leaders : मनसेच्या १७ वर्षांच्या वाटचालीनंतर या नियुक्त्या
Sandip Deshapande, Avinash Jadhav, Raju Umbarkar
Sandip Deshapande, Avinash Jadhav, Raju UmbarkarSarkarnama

Raj Thackeray Speech : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थ मैदानावर सभा पार पडली. या सभेसाठी राज्यातील मनसैनिकांनी गर्दी केली होती. या सभेत मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यावेळी नेतेपदाच्या, सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाच्या निवडी घोषीत करण्यात आल्या. त्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

मनसेच्या (MNS) १७ वर्षांच्या वाटचालीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांची नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि विदर्भातील उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्यातील तीन जणांसह पाचजणांची मनसेच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

Sandip Deshapande, Avinash Jadhav, Raju Umbarkar
MNS : तुला काय हवंय? पक्षप्रमुख व्हायचंय हो, मुख्यमंत्री व्हायचंय हो, पण माझं..; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग

सरचिटसपदी चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar), उपाध्यक्ष, रस्ता अस्थापनेचे अध्यक्ष योगेश परुळेकर, तर पुण्यातील उपाध्यक्ष बाळा शेडगे, गणेश सातपुते, रणजीत शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिकचे पराग क्षिंत्रे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, अॅडगुरू अशी ओळख असेले भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी समोरील जनसागर पाहून बाळासाहेबांच्या सभांची आठवण झाल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com