Devendra Fadnavis : 30 जून 2022, मी सरकार बाहेर असेन; 5 जून 2024, मला सरकारमधून मोकळं करावं, चाललंय तरी काय?

Devendra Fadnavis Offer Resign : महायुती सरकार स्थापन होताना आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधानं चर्चेत आली आहेत.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama

Mumbai News, 5 June : लोकसभा निवडणुकीत विरोधकांना गारद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या निकालात दारुण पराभव झालेल्या भाजपमध्ये पक्षातर्गंत वादाला तोंड फुटल्याची चिन्हे आहेत. पराभावाची जबाबदारी स्वीकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट सरकारमधून मोकळे होण्याचा पवित्रा घेतला.

यानंतर काही मिनिटांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ( Chandrashekhar Bawankule ) फडणवीस सरकारमध्ये हवे असल्याचे सांगून टाकले. यानिमित्ताने आता पुन्हा फडणवीस आणि 'उपमुख्यमंत्री' हे जुने समीकरण पुढे येत आहे.

शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदेंसोबत ( Eknath Shinde ) सरकार स्थापन करताना आणि नव्या सरकारच्या मुख्यमंत्रीपदावर शिंदेंचे नाव निश्चित होताच, फडणवीसांनी सरकारबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी दिल्लीने पुढाकार घेतल्याने काहीसे नाराज झालेल्या फडणवीसांनी तेव्हा शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्यास एकप्रकारे नकार दिला होता.

त्यानंतर दिल्लीतून फोनाफोनी होताच, फडणवीस ( Devendra Fadnavis ) सरकारमध्ये आले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेच फडणवीस आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र या पदावरून लांब राहण्याचा निर्णय घेत आहेत.

2022 मध्ये काय घडलं होतं?

जून 2022 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती. "आम्ही सत्तेच्या मागे नसून मुख्यमंत्रिपदासाठी काम करत नाही. ही तत्व, हिंदुत्व आणि विचारांची लढाई आहे. भाजप एकनाथ शिंदे यांना समर्थन देईल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर शिवसेना, भाजप आणि अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल. मी स्वत: सरकारच्या बाहेर असेन. पण, पूर्णपणे हे सरकार योग्यप्रकारे चाललं पाहिजे, ही जबाबदारी माझी असेन. त्यासाठी साथ आणि समर्थन देणार आहे," असं फडणवीसांनी सांगितलं होतं.

devendra fadnavis
Devendra Fadnavis : शिंदेंच्या आमदारांना 'चारसौ चालीस का करंट': भाजपचे एकला चलो रे...?

आता काय घडलं?

यातच करेक्ट 2 वर्षांनी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपनं 23 जागा लढवल्या होत्या. यात फक्त 9 जागांवर भाजपला यश मिळालं आहे. 14 जागांवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे. 2019 मध्ये भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे 23 वरून थेट 9 वर आकडा आल्यानं फडणवीसांनी पराभव मान्य केला करत सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा दिल्लीकडे व्यक्त केली आहे.

"जो काही पराभव झालाय. ज्या काही जागा कमी आल्या असतील. याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी स्वत:हा कुठेतरी यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. भाजपला महाराष्ट्रात सेटबॅक सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. मी पक्षाला विनंती करतो की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करावं आणि पूर्णवेळ काम करण्याची संधी मला द्यावी. जेणेकरून ज्या कमतरता राहिल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मला पूर्ण देता येईल. सरकारमध्ये जे काही करायचं ते आमची टीम करेल. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे. त्यांनी सांगितल्यानुसार मी कार्यवाही करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

त्यामुळे "मी सरकार बाहेर असेन" ते "मला सरकारमधून मोकळं करावं" अशी विधान देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com