Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ''...त्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतोय'' ; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला!

Devendra Fadnavis accuses Rahul Gandhi of defaming India abroad : ''विशेषकरून माझा त्यांना सल्ला आहे, की त्यांनी...'' असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis addresses the media, accusing Rahul Gandhi of tarnishing India's image on foreign soil.​
Devendra Fadnavis addresses the media, accusing Rahul Gandhi of tarnishing India's image on foreign soil.​ sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Criticizes Rahul Gandhi's International Remarks : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ''राहुल गांधींनी परदेशात जाऊन, भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशाप्रकारे ते ही बदनामी करत आहेत. हे निंदनीय अशाप्रकारचं कार्य आहे.'' असं म्हणत राहुल गांधींवर टीका केली आहे.

याचबरोबर मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''वारंवार निवडणुकीत हरल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना, अशाप्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की, ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत?''

Devendra Fadnavis addresses the media, accusing Rahul Gandhi of tarnishing India's image on foreign soil.​
Ramdas Athawale on Thackeray brothers : ''ठाकरे बंधूंना शुभेच्छा, आता..'' ; आठवलेंचं सूचक विधान अन् नव्या चर्चांना उधाण!

तसेच ''विशेषकरून माझा त्यांना सल्ला आहे, की त्यांनी जनतेत राहून काम केलं पाहिजे. जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मतं वाढणार नाहीत. जनतेत जर त्यांन विश्वासहर्ता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील. पण हे करायच्या ऐवजी भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं सुरु आहे.'' असा आरोपही केला.

याशिवाय ''महाराष्ट्रात ते हरले हरियाणात हरले. दिल्लीत ते हरले आता मतदान प्रक्रियेवर, मतदार यादीवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अतिशय बाळबोध अशाप्रकारचा हा प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावं आणि भारताची बदनामी करणं राहुल गांधींनी बंद करावं, असं आमचं त्यांना आवाहन आहे.'' अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी राहुल गांधींना शाब्दिक टोले लगावला आहेत.

Devendra Fadnavis addresses the media, accusing Rahul Gandhi of tarnishing India's image on foreign soil.​
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरे एकत्र आले, तर मराठवाड्यात मनसेला उभारी अन् शिवसेनेला बळ मिळणार!

राहुल गांधी नेमके काय म्हणाले?-

'निवडणूक प्रक्रियेत घोळ आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सायंकाळी साडेपाच ते साडेसात या दोन तासांत 65 लाख मतदान हे अशक्यच आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो. एवढ्या सगळ्यांनी मतदान केले असते तर पहाटे तीन वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली असती आणि मतदान करायला चार वाजले असते.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com