Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरे भाजप एकत्र येणार? फडणवीस अन् बावनकुळेंच्या वक्तव्याची एकच चर्चा

Chandrasekhar Bawankule News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत धुळवड साजरी केली.
Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule News
Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule NewsSarkarnama

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत धुळवड साजरी केली. या वेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षावर जोरदार टोलेबाजी केली. मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटे सांगून भांग पाजली होती, असे विधान फडणवीसांनी केले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनीही विरोधकांना मतभेद विसरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे फडणवीस आणि बावनकुळे यांच्या वक्तव्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

होळीच्या दिवशी सर्व शत्रूंना माफ केले जाते, याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ''आम्ही विधानसभेत उभे राहून म्हटले होते, ''खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला. त्या सर्व लोकांचा आम्ही बदला घेऊ, असे म्हटले होते. आम्ही त्या सर्व लोकांना माफ केले, हाच आमचा बदला आहे. आम्ही आधीच माफ केले. आमच्या मनात काहीही कटुता नसल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule News
Pune News : गेल्यावेळी काठावर पास झालेल्या शिरोळेंचेही टेन्शन वाढले; कसबा पॅटर्न हीट ठरणार?

तसेच आमचे काही मित्र आहेत, त्यांना मागच्या काळात कुणीतरी खोटे सांगून भांग पाजली. काही दिवस त्यांचे जे काही चालले होते, ते पाहून मजा आली. कुणी गाणे म्हणत होते तर कुणी रडत होते. मात्र, मी हे सांगण्याचा प्रयत्न केला, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा किंवा कामाचा नशा करावा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

होळीच्या दिवशी उत्तर भारतात शिमगा साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातही शिमगा साजरा केला जातो. मात्र, आपल्याकडे काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना एवढच सांगायचे आहे की, एखाद्या दिवशी शिमगा ठीक आहे. मात्र, उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसासारखे वागण्याचा प्रयत्न केला, तर बरे होईल, अशा शब्दांत फडणवीसांनी टोलेबाजी केली.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी विरोधकांनासुद्धा विनंती करतो की, आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसे हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे. संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावे. आमची नेहमीच त्यांना साथ राहिल.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. याबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले, संजय राऊत साहेबांनी उद्यापासून कुठलेही मनभेद आणि मतभेद न ठेवता आमच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule News
Pune News : कसब्याच्या विजयाने रमेश बागवेंच्या आशा पल्लवीत; कँटोन्मेंटमधील गणित बदलणार...?

यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टाळी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे आता राज्यात नवीन चर्चा सुरु झाली आहे. सध्या शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्योरोपांच्या फेरी मोठ्या प्रमाणात झडत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावर आज बावनकुळे यांनी मतभेद विसरण्याचे वक्तव्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com