देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दाऊदच्या पाठीशी उभे आहे का?

विधानसभेत आज पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी राज्यातील अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Devendra Fadnavis News Updates
Devendra Fadnavis News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

मुंबई - विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. विधानसभेत आज पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी राज्यातील अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे विधानसभेत एकच गोंधळ सुरू झाला. ही परिस्थिती पाहून विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी म्हणजे दुपारी साडेबारापर्यंत तहकूब केले. ( Devendra Fadnavis said, is the state government standing behind Dawood? )

नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) अटक केली आहे. या विरोधात भाजपने विधीमंडळ व विधीमंडळाच्या बाहेर महाविकास आघाडीला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार कालही विधीमंडळात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. आज विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपताच अध्यक्ष झिरवळ यांनी तारांकीत प्रश्न सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लगेच देवेंद्र फडणवीस यांनी माईकवर ताबा घेत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Devendra Fadnavis News Updates)

Devendra Fadnavis News Updates
नवाब मलिक यांच्यानंतर त्यांच्या मुलाला ईडीचा दणका

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात सातत्याने आम्ही विषय मांडत आहोत. काल सुध्दा आम्ही या संदर्भात वस्तुस्थिती सदना समोर ठेवली आहे. आमची विनंती आहे, की या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी घोषित करायला पहिजे. महाराष्ट्रातील एक मंत्री कारागृहात आहेत. तरीही मंत्रीपदावर आहेत. हे काही योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, तात्काळ मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे. किंवा मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांना मंत्रीमंडळातून काढले पाहिजे.

Devendra Fadnavis News Updates
दाऊदचा खरा 'फ्रंट मॅन' नवाब मलिक...निलेश राणेंचा घणाघात

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, या संदर्भात सभागृहात आत्ता काहीतरी घोषणा झाली पाहिजे. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यावर महाराष्ट्रातील सरकार जर नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिलं. तर जणू काही हे राज्य सरकार दाऊदच्या पाठीशी उभे आहे का?, अशा प्रकारचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी केली.

या मागणीमुळे सत्ताधारी व विरोधकांकडून विधानसभेत गोंधळ सुरू झाला. ही परिस्थिती लक्षात घेत अध्यक्ष झिरवळ यांनी विधानसभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com