Devendra Fadnavis To Rohit Sharma : देवेंद्र फडणवीसांनी रोहित शर्माला सांगितला राजकारणातील 'डकवर्थ लुईस' नियम..

Vidhan Parishad & Surykumar Yadav Indian Cricket Team : टीम इंडिया जिंकल्याचा आनंद सभागृहातील सर्वांच्या चेहऱ्यावर आहे.
Devendra Fadnavis, Rohit Sharma
Devendra Fadnavis, Rohit SharmaSarkarnama

Maharashtra Political News : टीम इंडियाने टी 20 विश्व कप जिंकल्याचा आनंद देशभर अद्यापही साजरा केला जात आहे. दिल्लीत गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाची मुंबईत लाखो चाहत्यांनी दणक्यात मिरवणूक काढली. त्यानंतर आज शुक्रवारी मुंबईतील खेळांडूंचा विधान परिषदेत सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील डकवर्थ लुईस नियम खेळांडून समजावून सांगितला.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, क्रिकेटप्रमाणे राजकारणातही डकवर्थ लुईस नियम आहे. कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल हे सांगता येत नाही. तसेच कुठे अॅव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही. असे असले तरी आज आम्ही एकत्र आहोत. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे. तो भाव म्हणजे आपला भारत जिंकला आहे. आणि तुम्ही तो जिंकवलाय हाच भाव आहे.

राज्यात 2019 नंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. 2019 मध्ये 103 जागा जिंकूनही भाजपला विरोधी म्हणून बसावे लागेल. तर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ठाकरेंच्या नेतृत्वातील शेवसेनेतून एकनाथ शिंदे 50 आमदारांसह बाहेर पडले आणि भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले.

वर्षभरात त्यांना राष्ट्रवादीतील अजित पवारही मिळाले. या सर्व घडामोडींचा फडणवीसांनी डकवर्थ लुईस नियम असा उल्लेख केला आणि त्यास सभागृहात बाके वाजवून दाद मिळाली. यावेळी फडणीसांनी रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाचे तोंडभरून कौतुक केले. तर यावेळी विधान परिषदेत सर्व आमदारांनी उभे राहून टीम इंडियाला अभिवादन करत भारत माता की जय असा जयघोषही केला.

Devendra Fadnavis, Rohit Sharma
Rahul Gandhi Join Pandharpur Wari : आषाढी वारीत सहभाग घेणाऱ्या राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांकडून 'नामजप'

सूर्यकुमारचा कॅच राजकारण्यांना प्रेरणादायी

लोकसभेनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आपला गड राखण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फिल्डिंग लावली जात आहे.

आता कुणाचा कसा कॅच घेऊन विकेट घ्यायची याची प्रेरणा सूर्यकुमार यादव याच्याकडून राजकीय व्यक्ति प्रेरणा घेतील, अशा आशयाचे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

रोहितची फटकेबाजी

क्रिकेटच्या मैदानावर षटकार, चौकार ठोकणाऱ्या टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्मा Rohit Sharma याने विधान परिषदेतही चांगलीच फटकेबाजी केली. तत्पुर्वी सूर्यकुमार यादवने, बरे झाले माझ्या हातात बॉल बसला, त्यामुळे आपण विजयी झालो, असे विधान केले होते. तोच धागा पकडून रोहित म्हणाला, बरे झाले तुझ्या हातात बॉल बसला, नाही तर मी तुलाच बसवला असता. रोहितच्या या मिश्किल टिपण्णीवर सभागृहातील कुणालाच हसू आवरता आले नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात चांगलीच फटकेबाजी केली. मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व खेळाडूंनी 11 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले तसेच सर्व खेळाडूंनीही आपले मनोगत व्यक्त करत मुंबईकर, मुंबई पोलिस आणि सभागृहातील सर्वांचे आभार व्यक्त केले.

Devendra Fadnavis, Rohit Sharma
Smita Wagh, Raksha Khadse : कोटीच्या कोटी उड्डाणे! स्मिता वाघ यांचा सर्वाधिक; तर रक्षा खडसेंचा खर्च किती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com