Devendra Fadnavis : शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ठाकरेंनाही द्यावीच लागते ; फडणवीसांनी डिवचलं

पक्षवादात कुणीही सीमावाद आणू नये असा टोलाही फडणवीसांनी ऊध्दव ठाकरेंना लगावला.
CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावांसह आता सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरुन रान पेटवलं आहेत. याच दरम्यान ऊध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी देखील पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. आता ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, आपल्या देशात संविधान आहेत. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही मोठे नाहीत किंवा इतर कुणीही मोठं नाही. कुणी कितीही सीमावर्ती भागातील गावांवर दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही. तसेच पक्षवादात कुणीही सीमावाद आणू नये अशा शब्दांत फडणवीसांनी ऊध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : 'आमच्याकडे हे सॅम्पल नको, याला वृद्धाश्रमात पाठवा'

शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. आणि कोश्यारी यांच्या विधानानंतर पहिली प्रतिक्रिया ही आमची होती. मात्र, आता राज्यापालांनी ज्यांच्यासमोर हे वक्तव्य केलं .त्या शरद पवार यांनी आजपर्यत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतू, आता पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ऊध्दव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. म्हणून ते बोलले असतील असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

राज्यात खोके सरकार आल्यापासून सातत्याने अवहेलना..

महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होतेय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावं, टपली मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं आता हे खूप झालं असा घणाघात ऊध्दव ठाकरे यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com