फडणवीस यांचा नेहमीचा जोश त्यांच्या भाषणात नव्हता : अजित पवारांची टोलेबाजी

Maharashtra Floor Test : अजित पवार यांची जोरदार टोलेबाजी
Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news
Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news Sarkarnama

मुंबई : विधानसभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने आज 164 मतांना बहुमताचा ठराव आज जिंकला. या ठरावानंतर आभाराचे भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुद्देसूद भाषण केले. शिंदे हे कसे कार्यक्षम नेेते आहेत, हे मांडण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांच्या भाषणानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोलेबाजी केली. त्यात त्यांनी फडणवीस यांच्या भाषणात नेहमीसारखा जोश नव्हता. ते व्यवसायाने वकिल आहेत. त्यांनी वकिली बाण्याने भाषण केले, असा टोमणा अजितदादा यांनी लगावला.(Ajit Pawar News in Marathi)

Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news
आजारी आमदार लंके अचानक विधानसभेत दिसले

अजितदादा म्हणाले, `` फडणविसांच्या भाषणाच नेहमीचा उत्साह, जोश आज दिसला नाही. तुम्ही आपल्या सरकारचे समर्थन वकिली पेशाने करण्याचा प्रयत्न केला. अर्थात सध्याच्या विधानसभेत फडणवीस हे सर्वात नशीबवान आहे. त्यांना अडीच वर्षांत मुख्यमंत्रीपद मिळाले, विरोधी पक्षनेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून ते आता काम पाहत आहेत. सत्ता येते आणि जाते. कोणी ताम्रपट घेऊन येत नाही. पण एकनाथ शिंदे यांचे ज्या पद्धतीने फडणवीस यांनी समर्थन केले की त्याचे आश्चर्य वाटले. एकनाथ शिंदेंचे गुणगाण फडणवीस यांनी गायले. त्यांची देदिप्यमान कारकिर्द असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पण फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिंदे यांना महत्वाचे खाते दिले नाही. जनतेशी संबंधित एकही खाते शिंदे यांच्याकडे नव्हते. तेव्हा फडणवीस यांनी स्वतःच्या अधिकारात शिंदे यांना एखादे खाते द्यायचे होते ना!

Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news
फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही रडतायत : अजितदादांचे चिमटे!

अजित पवार यांनी हे सरकार कशा पद्धतीने अस्तित्वात आले यावर महाराष्ट्र नक्की विचार करेल, असा इशारा दिला. आज अनेक गोष्टी न्यायप्रविष्ठ आहेत. अकरा तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घ्यायचे कारण होते का, असा सवाल त्यांनी विचारला. आमच्या सरकारच्या काळात अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचे काम राज्यपालांनी केेल. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचे प्रकरणे अडीच वर्षे झाली तरी केली गेली नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही अनेकदा त्यांना भेटूनही घेतली गेली नाही. आता मात्र राज्यपाला अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com