मी एकटा पडतोय, महिला आयोगाचा पाठिंबा हवा! संजय पांडे यांनी मांडली व्यथा

संजय पांडे यांच्या नियुक्तीवरून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Sanjay Pandey
Sanjay PandeySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांचा पाढा मंगळवारी वाचला. राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) कार्यक्रमात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी महिला आयोगालाही साकडं घातलं. यावेळी त्यांनी काही उदाहरणे देत महिला कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच एकटा संजय पांडे बदल करायला पुरेसा नाही, महिला आयोगाचा, महिलांचाही पाठिंबा मिळायला हवा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

राज्य महिला आयोगाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज डोंगरीमध्ये एका कॉन्स्टेबलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगत पांडे म्हणाले, त्यांच्या घरी बायकोबरोबर संबंध चांगले नव्हते. हे वातावरण कसे निर्माण झाले? याचे मुलभूत कारण आपले शिक्षण आहे. आपण मान्य केलेले लग्नाचे संस्कार पार पाडण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. पण एकाकडे बोट दाखविणे योग्य नाही. कारण टाळ्या दोन्ही हाताने वाजतात. आमच्याकडे 1 लाख 95 हजार कॉन्स्टेबल आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. आमच्याकडे अनेक जण आत्महत्या करत आहेत. घटस्फोट होत आहेत. महिला आयोगाने पुरूष आणि महिला दोघांचेही समुपदेशन करावे, त्यासाठी पोलिस यंत्रणेकडून सर्व मदत केली जाईल. पोलिसांचे संसार उद्धस्त होऊ नयेत.

Sanjay Pandey
माझे पद घेण्यासाठी बरेचसे लोक आहेत; पोलीस महासंचालक पांडे यांनी सोडलं मौन

अनेक वर्षांपासून आमच्याकडे किती तरी महिला पोलीस अशा आहेत ज्यांना 24 तास ड्युटी आहे. आम्ही नागपूर व इतर काही ठिकाणी आठ तासांची ड्युटी केली आहे. पण अनेक ठिकाणी झाले नाही. आमच्याकडे अजून एवढी जाणीव नाही की, महिलांना घरी जाऊन जेवण बनवायचे असते. घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी व्हायलाच हवी. त्यासाठी महिला आयोगाचा पाठिंबा पाहिजे. मी एकटा पडतोय, असं खंत पांडे यांनी यावेळी जाहीरपणे व्यक्त केली. हा सामाजिक बदल करायला हवा. एक संजय पांडे हा बदल करायला पुरेसा नाही. त्यासाठी आयोगासह सर्व महिलांचा पाठिंबा हवा आहे, असे आवाहनही पांडे यांनी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना केले.

Sanjay Pandey
पूनम महाजनांसमोर राऊतांची माघार; नामर्द म्हणताच 'ते' ट्विट केलं डिलीट

मला नगरच्या एका महिला कॉन्स्टेबलचा फोन आला होता. ती सांगत होती, साहेब चार दिवस मी ड्युटी करतेय. मी कसं जगू, ही परिस्थिती बदलायला हवी. माझे ऑफीस महालासारखे आहे. पण नायगाव पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी शौचालय नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात शौचालय असायला हवे. जर महिलांसाठी अशा सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नसू, तर त्याचा विचार करायला हवा.

काही काळापासून पती-पत्नी असतील तर त्यांना एकाच ठिकाणी पोस्टिंग करण्याचे केंद्राचेही धोरण आहे. आपल्याकडे नवरा सोलापूरमध्ये असतो तर पत्नी नागपूरात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना आपण एका ठिकाणी ड्युटी देऊ शकत नाही. हा बदल करायला हवा. सगळीकडे हे होते, पण आपल्याकडे का होत नाही. हे करणे खूप गरजेचे आहे, असे सांगत महिलांना आठ तास ड्युटी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com