Munde VS Shelar : धनंजय मुंडे अन् आशिष शेलार सभागृहातच भिडले; नेमकं काय घडलं?

Budget Session : धनंजय मुंडे अन् आशिष शेलार या दोघांचाही आवाज चढलेल्या स्वरात बघायला मिळाला.
Dhananjay Munde and 
Ashish Shelar
Dhananjay Munde and Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होतात. अनेकवेळा सत्ताधारी आणि विरोधकही आमनेसामनेही येतात.

आज राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजपचे आशिष शेलार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी दोघांचाही आवाज चढलेल्या स्वरात बघायला मिळाला. यामुळे सभागृहामध्ये काही वेळ गोंधळ झाला.

Dhananjay Munde and 
Ashish Shelar
Patan : गोळीबार प्रकरणावरुन अजित पवार संतापले...म्हणाले, मोगलाई लागून गेली आहे का...

नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडे हे सभागृहामध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ''आज महसूल विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागासह अनेक विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे ज्या-त्या विभागाचे मंत्री महोदय येथे उपस्थित असायला पाहिजेत.

मात्र, येथे फक्त कृषी आणि वैद्यकीय विभागसोडून कुणीही हजर नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यात डिमांडवर चर्चा आहे आणि तरीही मंत्री उपस्थित नाहीत'', असं म्हणत मुंडेंनी संताप व्यक्त केला.

Dhananjay Munde and 
Ashish Shelar
Patan : पाटणला गोळीबारात दोघांचा मृत्यू; शिवसेनेचा माजी पदाधिकारी ताब्यात

यानंतर संबंधित मंत्र्यांना निरोप दिला आहे, असं सभागृहाच्या अध्यक्षांनी मुंडेंना सांगितलं. मात्र, मंत्री महोदय असं अनुपस्थित राहत असतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय देणार? असा सवाल करत मुंडे आक्रमक झाले. मात्र, लगेच आशिष शेलार हे सभागृहामध्ये बोलण्यास उभे राहिले.

यावेळी शेलार म्हणाले, ''ज्या वेळी अध्यक्षांनी कार्यक्रम घोषित केला तेव्हा जर मुंडे असते तर त्यांनी अशी आदळ आपट केली नसती. अध्यक्षांनी जेव्हा कार्यक्रम घोषित केला त्यामध्ये आता मुंबईच्या विषयावर चर्चा होणार होती. त्यानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार होती. मात्र, आता चर्चा सुरू करा मंत्री येतील, असं शेलारांनी सांगितलं.

Dhananjay Munde and 
Ashish Shelar
Ambadas Danve News : बनावट इंजेक्शन, गोळ्यांची विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा ..

त्यानंतर गिरीश महाजन यांनीही मध्यस्थी करत चर्चा सुरू करण्याची मागणी केली. मात्र, तरी देखील धनंजय मुंडे हे न ऐकता आणखी आक्रमक झाले. त्यानंतर पुन्हा शेलारांनी स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, शेलार आणि मुंडे यांच्या जोरदार खडाजंगीमुळे सभागृहात काही वेळ गोंधळ झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com