Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे दिला राजीनामा; करूणा शर्मा यांचा दावा

Dhananjay Munde's Resignation Claim by Karuna Sharma : 3 मार्च को राजीनामा होगा, अशी पोस्ट करुणा शर्मा यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर आता मुंडे यांनी राजीनामा दिला की नाही, याबाबतच उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
Dhananjay Munde-Ajit Pawar
Dhananjay Munde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Karuna Sharma Post : उद्यापासून राज्याचे अर्थंसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी केला.

याबाबत करुणा मुंडे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवासापूर्वी मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची आपल्याला माहिती आहे, असे ठोसपणे करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Dhananjay Munde-Ajit Pawar
ESakal: देशातील नेटकऱ्यांची सर्वाधिक आवडती मराठी वेबसाईट 'ई-सकाळ'चं ; ‘कॉमस्कोअर’ कडून शिक्कामोर्तब

३ मार्च रोजी राजी नामा होगा, अशी पोस्ट करुणा शर्मा यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर आता मुंडे यांनी राजीनामा दिला की नाही, याबाबतच उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव आले, आहे सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होते आहे.

करुणा मुंडे यांनी यापूर्वीही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. याप्रकरणी मुंडे यांनी परळी कोर्टात धाव घेतली आहे.

अधिवेशनाच्या अगोदर त्यांच्याकडून अजितदादा राजीनामा घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं होतं की, जरी वाल्मिक कराड दोषी निघाला, तर मी स्वतः राजीनामा देणार.. आता त्यांच्यासमोर कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागेल, असे करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com