Shivsena Dharavi Morcha : पाप असेल तर ते फडणवीसांचं, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Dharavi Morcha Sabha Update : धारावीतील मोर्चानंतर आता सभा सुरू झाली आहे... या सभेतून
Uddhav Thackeray Dharavi Morcha
Uddhav Thackeray Dharavi MorchaSarkarnama

समजणाऱ्यांना इशारा काफी आहे. हा इशारा मोर्चा आहे. अगदी दूरपर्यंत हा मोर्चा आहे. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाजा अहमदाबादपर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाज जे त्यांचे चेले, दलाल, सुपारीबाज आणि भाडोत्रीपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

बुलेट ट्रेनसाठी जमीन दिली. मग मुंबईत राहिलं काय? मुंबई नासवून टाकायची. पुन्हा मुंबईची बदनामी करायची. करोना काळात घोटाळा झाल्याचा आरोप करायचा. पण धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्याआधी तुमचा जो पायजमा सुटलाय ना तो पहिले वर घ्या - उद्धव ठाकरे

धारावीत गिरणी कामगार, पोलिस, सफाई कर्मचारी यांना घरं द्या. गुजरात पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे, तसं दुसरं आर्थिक केंद्र धारावीत बनवा- उद्धव ठाकरे

ह्यांचा डाव लक्षात घ्या, धारावीतील अपात्रांना मीठागरांच्या जागेवर त्यांना वसवणार. आतापर्यंत 55 हजार अपात्र आहेत. लाखाच्यावर ठरवतील अजून. म्हणजे इथली उचलणार मीठागरात टाकणार. मीठागराची जागाही अदानीच्या घशात जाणार- उद्धव ठाकरे

कोरोनाचं संकट आलं होतं मुंबईवर आणि धारावीवर. सगळ्यांना घाम फुटला होता. तुम्ही थाळ्या वाजवा आम्ही आमचं काम करतो, असे आम्ही म्हटले होते. तुम्ही एवढचं सांगितलं गो कोरोना गो... थाली बजाओ... हे धंदे तुम्ही केले. पण कोरोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय?- उद्धव ठाकरे

धारावीत काय बनत नाही. लोणची बनतात, पापड बनतात. जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाटून उन्हात वाळात टाकू तुम्हाला. सगळे काही देणारी ही धारावी आहे- उद्धव ठाकरे

सब कुछ अदानी, धारावी अदानीकडे आत देवनारही अदानीकडे देतायेत. विमानतळ तर आधीच दिलेले आहे. मोतीलाल नगर दिले आहे. नवीन विमानतळही दिले आहे. रेक्लेमेशन अदानी, आदर्श नगर अदानी, अभ्युदयनगर अदानी, हे असे चालणार नाही. धारावीमध्ये चपलासुद्ध बनतात, हे लक्षात ठेवा- उद्धव ठाकरे

आता तुमच्या लक्षात आलं असेल अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं, ते खोके कुणी पुरवले असतील, अता तुम्हाला लक्षात आलं असेल. खोके कुणाकडणं गेली असतील, विमानं कुणी पुरवली असतील, हॉटेल बुकींग कुणी केलं असेल? आणि मुळात सरकार पाडण्याचं कारण तुम्हाला कळलं असेल- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेताय. मग तुम्ही अदानीचे जे बुट चाटतायेत ते कशासाठी? मी मुख्यमंत्री असताना नागरिकांना बाजूल ठेवून बिल्डरसाठी घेतला, असा एकतरी निर्णय दाखवा- उद्धव ठाकरे

सरकार आपल्या दारी नव्हे तर, हे सरकार अदानीच्या दारी आहे. शौचालय, नाल्या गटारी, सगळ्याचा टीडीआर अदानाली दिला आहे. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा दिला नाही- उद्धव ठाकरे

50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघालेत हे बोके. यांची मस्ती वाढत चालली आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. यांना असं वाटतंय कोणी जाब विचारू शकत नाही- उद्धव ठाकरे

संपूर्ण मुंबईच काय अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेस, असं वचन मी दिलं होतं. ज्यांनी अदानीची सुपारी घेतली त्या दलालांना सांगतो, हा अडकित्ता लक्षात घ्या. खलबत्ता आणि अडकित्ता आहे. तुमची दलाली अशी ठेचू की पुन्हा अदानींचं नाव घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा

हे सरकार अदानीच्या दारी. पाप असेल तर ते देवेंद्रचं. सब भूमी अदानी की असे होऊ देणार नाही. धारावीचा गळा घोटू असा एकतरी जीआर आम्ही काढला का?, असे म्हणत उद्धव ठाकरेंचा घणाघात

विनायक राऊत यांची भाजपवर टीका अदानीच्या जोखडातून अदानीचे दलाल म्हणून वावरणारे भाजपचे नेते आणि त्यांच्या जोखडातून वाचण्यासाठी धारावी बचावचा हा मोर्चा, विनायक राऊत यांची टीका

मॅच फिक्सिंग करून शिंदे-फडणवीस सरकारने लाडका जावाई अदानीला आणले धारावी पुनर्विकासाचे काम दिले. अदानी आल्यावर रोज एक नवीन जीआर निघतोय. त्याला कशी सूट देता येईल, असे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप संजीव कोरडे यांनी केला

शिंदे फडणवीसांचे सरकार येताच त्यांनी 2022 ला नवीन जीआर आणला आणि 2018 चा जुना जीआर आहे तो पुनर्जीवित केला. नव्या जीआरमध्ये पूर्वीच्या जीआरमध्ये ज्या सवलती दिल्या होत्या, त्याहून अधिक सवलती नवीन जीआरमध्ये अदानींना दिल्या गेल्या आसा आरोप अॅड संजीव कोरडे यांनी केला

धारावीतील मोर्चा हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग शिवसेनासोबत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय, माकप, भाकप, जनता दल सेक्युलर, सर्व समाज जनता पार्टी, धारावी भाडेकरू महासंघ, धारवीतील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्था, चाळ कमिट्या संस्था, संघटना मंडळं सहभागी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com