Vijay Wadettiwar News: वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करणार; आत्रामांनी सांगितली तारीख; खोटं असेल नार्को टेस्ट करा...

Dharmarao Baba Atram :आत्राम यांनी वडेट्टीवारांवर आरोप केल्यानंतर "धर्मरावबाबांनी आरोप सिद्ध करावे, कोणत्या हॉटेलमध्ये बैठक झाली, याचा खुलासा करावा," असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले होते. या आव्हानाला आज धर्मरावबाबा आत्राम यांनी उत्तर दिले आहे.
Vijay Wadettiwar News
Vijay Wadettiwar NewsSarkarnama
Published on
Updated on

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार, असे विधान अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेकदा प्रचार सभांमध्ये केले आहे. त्यांच्या या विधानावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत ही माहिती चुकीची असल्याचे म्हटलं आहे. पण आता आत्राम यांनी वडेट्टीवार हे कधी भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतची तारीख जाहीर केली आहे.

आत्राम यांनी वडेट्टीवारांवर आरोप केल्यानंतर "धर्मराव बाबांनी आरोप सिद्ध करावे, कोणत्या हॉटेलमध्ये बैठक झाली, याचा खुलासा करावा," असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले होते. या आव्हानाला आज धर्मरावबाबा आत्राम यांनी उत्तर दिले आहे.

"मुंबईच्या विमानतळावर टर्मिनल एकमध्ये त्या वेळचे मंत्री असलेले विजय वडेट्टीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझ्या उपस्थितीत आमची बैठक झाली. यामध्ये वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर चर्चा झाली. हे खोटं असेल तर विजय वडेट्टीवार आणि माझी ही एकत्र नार्को टेस्ट करा," असे आत्राम म्हणाले.

या बैठकीसंदर्भात अधिक माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देतील. 4 जूननंतर वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करतील हे खरं आहे, असे आत्राम यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar News
Utkarsha Rupwate News: उत्कर्षा रूपवतेंच्या 'वंचित'मधील एन्ट्रीने शिर्डीत तिरंगी लढत होणार?

यापूर्वी वडेट्टीवार यांनी धर्मरावबाबा यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. 'धर्मरावबाबा जर खरे राजा असतील आणि खरंच त्यांच्या दाव्यात दम असेल तर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये भेट झाली त्याचे नाव सांगावं, भाजप प्रवेशासंदर्भात झालेल्या बैठकीचा पुरावा दाखवावा, त्यांनी तसे पुरावे दिल्यास आणि आपला दावा सिद्ध केल्यास मी त्यांची गुलामगिरी करेल, असे सांगत वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com