Kalyan-Dombivli Politics : कल्याणमधील सत्तेचे गणित बदलणार? ठाकरे गट आणि भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये बंद दाराआड चर्चा

Ganpat Gaikwad, Subhash Bhoir : भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा
Ganpat Gaikwad, Subhash Bhoir News
Ganpat Gaikwad, Subhash Bhoir NewsSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli News : कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यातच या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर व भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड या आजी-माजी आमदारांनी बंद दरवाजा चर्चा केली. योग्य वेळी आम्ही योग्य चर्चा करू असे सूतोवाच दोघांनी केल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले असताना ठाकरे गट आणि भाजप यांच्या आमदारांच्या या भेटीने भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली पहायला मिळतील का? या चर्चांना उधाण आले आहे.

Ganpat Gaikwad, Subhash Bhoir News
Abdul Sattar News : सत्तारांच्या बाबतीत असे काही घडलेच नाही, देसाईंनी स्पष्टच सांगितले

राज्यात मित्रपक्षात धुसफूस सुरू असून ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाच्या या हक्काच्या जागेवर भाजपने दावा करत शिंदे यांना आव्हान देऊ केले आहे. भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच भोईर (Subhash Bhoir) यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवर भावी खासदार असा भोईर यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे हे देखील पुन्हा सक्रिय झाले, असून त्यांच्या ही नावाची चर्चा इच्छुक उमेदवारांत केली जात आहे. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू असून यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाची साथ मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच गुरुवारी गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष भोईर यांनी गायकवाड यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Ganpat Gaikwad, Subhash Bhoir News
Raj Thackeray News : 'राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री!'

या वेळी बंद दाराआड त्यांच्यात चर्चा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार गायकवाड म्हणाले, आमचे घरचे संबंध आहेत. ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. असे असले तरी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? याची चर्चा आता रंगू लागली आहे. माजी भोईर हे लोकसभेची तयारी करत आहेत? भविष्यात भोईर हे भाजपची (BJP) वाट धरणार का? याची पुन्हा एकदा या भेटीनंतर चर्चा होत आहे.

शिंदे गट आणि भाजप मधील वाद क्षमला नाही तर भाजप छुप्या पध्दतीने ठाकरे गटाला देखील मदत करू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामुळे भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com