Abdul Sattar News : सत्तारांच्या बाबतीत असे काही घडलेच नाही, देसाईंनी स्पष्टच सांगितले

Akola News : अकोला जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापे टाकले होते.
Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shambhuraj Desai News : शिंदे गटाचे नेते कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अकोला जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यावर धाडी टाकतांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे पीए आणि इतर काही लोक उपस्थित असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्या अगंलट आले आहे. यावरुन विरोधकाकडून चौफेर टीका होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही सत्तारांचे कान टोचल्याची चर्चा होती. त्यावरुन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देसाई म्हणाले, ''मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही उपस्थित होतो. मंत्री सत्तारांना (Abdul Sattar) कुणीही काहीही बोलले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांचे कान टोचले असे वृत्त आले आहे, ते पूर्ण चुकीचे आहे. असे काही तिथे घडलेच नाही.'' सत्तार यांना अकोला जिल्ह्यातील छाप्याचे प्रकरण महागात पडणार, असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Minister Abdul Sattar News
Eknath Shinde on Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचले ; कारभार सुधारा ; तुमचे जे चालले ते वाईट..

दरम्यान, अकोला जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापे टाकले होते. त्या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक सामील होते. त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला असून त्यावरुन अकोल्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे.

Minister Abdul Sattar News
Raj Thackeray birthday : राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त मनसैनिकांकडून मागितले 'हे' खास गिफ्ट

अकोला (Akola) येथे कृषी विभागाच्या पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांवर ठाकलेल्या धाडीचे प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे. कृषी विभागाने धाड टाकलेल्या पथकातील दिपक गवळी नावाची व्यक्ती ही आपला पीए नसल्याचे माध्यमांना जाहीर पणे सत्तारांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर मंगळवारी दिपक गवळी हा आपला पीए असल्याचे सत्तार यांनी सांगितले. त्यावरुन आता पुन्हा त्यांच्यावर टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com