Rohit Pawar News : 'मला अजितदादा व्हायचं नाही...'; रोहित पवारांनी सुनील तटकरेंना फटकारले...

NCP Politics : रोहित पवारांनी भाजपसह अजित पवार गटातील नेत्यांवर टीका केली.
NCP  Politics
NCP Politics Sarkarnama
Published on
Updated on

Dombivali : "रोहित पवारांना अजितदादा व्हायचंय," अशी टीका अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे यांनी केली होती, त्याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. "अजितदादा मोठे नेते आहेत, मला अजितदादा व्हायचं नाही. मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलो नाही, विचार जपण्यासाठी आलो आहे. काही नेत्यांना तर वाटत असेल की, मला नेता बनायचे तर मला नेता बनण्याची घाई नाही," असा टोला रोहित यांनी तटकरे यांचे नाव न घेता लगावला.

कल्याण येथे इंडिया आघाडीच्या सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ढोल-ताशा गजरात राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांचे स्वागत करण्यात आले. आगरी कोळी समाजाच्या वतीने कोळी टोपी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रोहित पवारांनी भाजपसह अजित पवार गटातील नेत्यांवर टीका केली.

NCP  Politics
Rohit Pawar News : शरद पवारांना डिवचल्यावर काय होतं हे त्यांना समजेल; रोहित पवारांनी भाजपला सुनावले खडेबोल

"भाजपने केलेले सर्वेक्षणाचे रिपोर्ट हे भाजपची परिस्थिती ठीक नसल्याचे दाखवित आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही. हे पाहता भाजपने शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडला. सत्तेसाठी ही फोडाफोडी करूनदेखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही," असे रोहित म्हणाले.

"राष्ट्रवादीमध्ये हात घालून त्यांनी शरद पवारांना डिवचले असून, पवारांना डिवचल्यावर काय होतं, हे आता त्यांना समजेल," असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवारांनी भाजपला लगावला. ठाणे जिल्ह्यातील विकासकामांवरून येथील जनता नाराज आहे, असे सांगत अप्रत्यक्षरित्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनादेखील लक्ष केले.

उल्हासनगर येथे पप्पू कलानी यांची रोहित यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, जिल्हा अधीक्षक सचिन पोटे, विकास लवांडे, वंडार पाटील, सचिन बासरे, रवी कपोते, अंकुश जोगदंड उपस्थित होते.

Edited By : Mangesh Mahale

NCP  Politics
Women Reservation Bill : महिला आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, "ओबीसींची एवढी बाजू घेता तर..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com