Dombivli: भाजप विरोधातच शिंदे गटाची तयारी? 'डोंबिवली'साठी शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी थोपटले दंड

Dombivli Assembly Election Ravindra Chavan Vs Dipesh Mhatre:राज्यातील महायुतीतील मित्र पक्षातील शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे. दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
Dombivli Assembly Election Ravindra Chavan Vs Dipesh Mhatre
Dombivli Assembly Election Ravindra Chavan Vs Dipesh MhatreSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुकांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर भाजपचा पहिला दावा असेल असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच केले आहे.

याच मतदारसंघात भाजपचे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे हे देखील आमदारकी लढविण्यासाठी दंड थोपटले आहे. मतदारसंघावरून आता भाजप व शिंदे गटात पुन्हा खडाजंगी होणार का ? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे.गेले तीन टर्म मंत्री रविंद्र चव्हाण हे येथील आमदार आहेत. भाजपकडे हा मतदारसंघ असताना आता राज्यातील महायुतीतील मित्र पक्षातील शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे. दीपेश म्हात्रे यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना भाजपने याठिकाणी दावा करत शिवसेना शिंदे गटाला धारेवर धरले होते. लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाने दावा करत भाजपला आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व व डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर भाजपचा पहिला दावा असेल असे जाहीर सांगितले होते. आता दीपेश म्हात्रे हे येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आपण तयारी सुरू केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.

Dombivli Assembly Election Ravindra Chavan Vs Dipesh Mhatre
Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज; हिंमत असेल तर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा...

काय म्हणाले शिवसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे...

डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभेत आमची तयारी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी आमचे निरीक्षक नेमलेले आहेत. पक्षाची बांधणी शहरात कशी मजबूत होईल यासाठी प्रयत्न करतोय. पक्षाने जबाबदारी दिली तर दोन्ही विधानसभेत आम्ही लढू शकू आणि आमची लढायची तयारी आहे. मी डोंबिवली मधून इच्छुक आहे, माझी इच्छा देखील आहे की डोंबिवलीतन निवडणूक लढवावी. पक्षाची जी भूमिका असेल त्यासोबत मी बांधील आहे.

14 वर्षाचा वनवास संपवणार

गेल्या 14 वर्षाचा डोंबिवलीचा वनवास तो संपण्यासाठी नवीन नेतृत्व नवीन चेहरा समोर येत असेल तर त्याला लोकांनी पाठबळ दिलं पाहिजे, असा टोमणा देखील म्हात्रे यांनी विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला आहे. डोंबिवली शहराची टप्प्याटप्प्याची दुरावस्था बाहेर काढणार आहे. शहराच्या दृष्टीने कुठलेही काम झालं नाही. डोंबिवली आमच जन्मगाव आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. डोंबिवली व कल्याण विधानसभेत आम्ही आमचा प्रयत्न शंभर टक्के करणार, असे म्हात्रे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com